no images were found
मलिक अँम्युझमेंट प्रेझेंट्स आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडवर उभ्या मनोरंजन नगरीला कोल्हापूरकरांनी भेट द्यावी – जयराज
कोल्हापूर/प्रतिनिधी : जगभरात ज्या काही वास्तू व भव्य प्रतिकृती आहेत त्या पाहण्यासाठी सर्वांनाच शक्य नसते.या वास्तू व भव्य प्रतिकृती पाहण्याची संधी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंडवर उपलब्ध झाली आहे.मलिक अँम्युझमेंट यांनी ही संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिली आहे.ही मनोरंजन नगरी सुरू झाली असून या नगरीला कोल्हापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन जयराज यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यामध्ये मलेशियन इन टॉवर, दुबई म्युझियम,लंडन ब्रीज, बुर्ज खलिफा,मुन बिल्डिंग, ब्रोकन बिल्डिंग,रिबेन बिल्डिंग,अल रबा बिल्डिंग,ग्लोबल युनिव्हर्सल,फ्रेम बिल्डिंग दुबई आदी पहावयास मिळणार आहे.शिवाय खेळाच्या विविध साधनांमधून धमाल मस्ती करायला मिळणार आहे. आणि विविध ग्रहोपयोगी वस्तू,खाद्यपदार्थ यांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.सांगली जिह्यातील कपिल मलिक यांच्याद्वारे ही नगरी उभी करण्यात आली आहे.या नगरीमध्ये कोल्हापूरकरांना हे सर्व पहावयास मिळणार असून कोल्हापूरकरांनी यास भेट द्यावी असे आवाहन माहिती व्यवस्थापक जयराज व कपिल मलिक यांनी यावेळी केले आहे.
“सेल्फी आर्ट गॅलरी” शिवाय स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थ खाण्याची संधी याठिकाणी उपलब्ध झाली आहे. खेळाच्या माध्यमातून धमाल मस्ती करता येणार आहे.
सेल्फी आर्ट गॅलरी मधून प्रत्यक्ष स्वतःचा फोटो काढता येणार आहे.
याचबरोबर याठिकाणी खेळणी महिलाना लागणारे साहित्य किचन साहित्य आदी विक्रीसाठी २५ स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्याची खरेदी करता येणार आहे तरी या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या या मनोरंजन नगरीत खेळण्यांमध्ये मोठ्यासाठी जॉईंट व्हील,ब्रेक डान्स,कोलंबस,ड्रॅगन ट्रेन,टोरा टोरा,आकाश पाळणा व लहान मुलांसाठी मोटरसायकल, ड्रॅगन ट्रेन, क्लास वेल पाळणे पाण्यातील कोलंबस,मिकी माउस,नवीन रेंजर व ऑक्टोपस असे विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व नगरीमध्ये शंभर जणांची टीम कार्यरत असून कोल्हापूरमध्ये या नगरीच्या माध्यमातून आता दीड महिने मनसोक्त धमाल-मस्ती कोल्हापूरकरांना करता येणार आहे.ही नगरी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.येणाऱ्या ३१ मे पर्यंत मनोरंजन नगरी कोल्हापूरच्या सेवेत राहणार आहे.तरी या नगरीला कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.