no images were found
सामनाच्या अग्रलेखावर शरद पवारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
राजकीय नेतृत्व निर्माण करण्यात शरद पवारांना अपयश आल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात केली होती. त्याला शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६४ वी पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहिती नाही, हा आमच्या घरातील प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना संधी देऊन मंत्री केले आहे. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहीर करत नाही, आम्ही अनेक नेतृत्व घडवलेली आहेत. तसेच कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही दुर्लक्ष करतो, त्यामुळे सामनातील अग्रलेखाला महत्व देत नाही. त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना फटकारले.
सत्ता संपत्तीच्या जोरावर माणसे फोडली जातात कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे राजीनामा मागे घेतला. मला लोकांनी थांबू दिले नाही. लोकशाहीत लोकांची इच्छा महत्त्वाची आहे. आणखी जोमाने काम करणार आहोत. लोकांची इच्छा डावलता येत नाही, असे सांगत त्यांनी राजीनामा मागे घेण्यावर भाष्य केले आहे. शरद पवारांनी भाजपच्या सत्ता नीतीवर देखील हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी येनकेन प्रकारे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर माणसे फोडली जातात, असा त्यांनी थेट आरोप केला.