Home Video अमली पदार्थ विरोधी कारवायांना गती द्यावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे

अमली पदार्थ विरोधी कारवायांना गती द्यावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे

6 second read
0
0
19

no images were found

अमली पदार्थ विरोधी कारवायांना गती द्यावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्या लगत सांगली,सातारा तसेच कराड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे .त्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा पोलीस प्रशासनाने अमली पदार्थ विरोधी शोध मोहिमेस गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले .
जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार उपस्थित होते .
जिल्हाधिकारी म्हणाले , जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ,डोंगर परिसर, फार्म हाऊस या ठिकाणी तसेच राधानगरी ,चंदगड,गगनबावडा या पर्यटन स्थळी पोलीस विभागामार्फत तपासणी करून अमली पदार्थ खरेदी वा विक्री होणार नाही याची खातरजमा करावी.शिरोली ,हातकणंगले व गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतीमध्ये बंद पडलेले तसेच चालू केमिकल कारखाने एमआयडीसीचे अधिकारी व पोलीस विभागामार्फत तपासण्यात यावेत.
शिक्षण व पोलीस विभागामार्फत शहर व जिल्ह्यातील माध्यमिक व व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस पाटलांमार्फत ग्राम स्तरावर अमली पदार्थ विक्रीबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी अशी निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
या बैठकीसाठी महिला व बाल विकास विभाग अधिकारी सुहास वाईंगडे,माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क ,अन्न औषध प्रशासन,औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…