Home शैक्षणिक “विवेक दिप” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

“विवेक दिप” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

4 second read
0
0
125

no images were found

“विवेक दिप” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

कागल : तालुक्यातील मुरगुड येथे शिवगड आध्यात्मिक ट्रस्टचा नववा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला याचे औचित्य साधत जेष्ट पत्रकार व लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या विवेक दीप या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला

    कोल्हापुर येथील शिवगड अध्यात्म ट्रस्ट ही अध्यात्मिक क्षेत्रातील मोठे नाव परमपूज्य सद्गुरु वेदांत भास्कर डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षापासून एक ट्रस्ट आध्यात्मिक प्रसारासाठी काम करते या ट्रस्टचा वापर नववा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला यावेळी नागपूरच्या सद्गुरु दास महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या आध्यात्मिक कार्यावर निरूपण झाले याच प्रवर्धापन दिनाच्या औचित्य साधून कागल तालुक्यातील मुरगुड येथील जेष्ठ पत्रकार व लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या विवेक दीप पुस्तकाचा प्रकाशन सोळा देखील पार पडला.

    चंद्रकांत माळवदे यांनी मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज येथे इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून काम पाहिले आहे. ते उपमुख्याध्यापक या पदावर सेवानिवृत्ती झाले. त्याचबरोबर त्यांनी दैनिक सकाळमध्ये जवळपास वीस वर्षे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. यासाठी त्यांना विशेष गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अध्यात्मिक लेखनाची आवड असून याच माध्यमातून ते शिवगड ट्रस्टची जोडली गेले आहेत. ते शिवगड अध्यात्म ट्रस्ट द्वारा संचलित भक्तीयोगची पाच वर्षे संपादक राहिले आहेत. विवेक दीप ही त्यांची दुसरी पुस्तक असून त्याआधी त्यांनी गोऱ्या व फुले हे आत्मकथन पर पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे या कार्यक्रम प्रसंगी अकोल्याचे प्रवचन कार जयश्रीताई सांगवीकर यांना ट्रस्टतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय प्रवचनकार मंदाताई गंदे, प्रकाश मुळे अमरावती शिवगड ट्रस्ट संस्थापक डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, अध्यक्ष समरजीत सिंह घाडगे, उपाध्यक्ष स्नेहाताई महाजन, डॉक्टर नीना मोडक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनय कुलकर्णी यांनी केले व आभार अशोकराव कौलकर यांनी मांडले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…