no images were found
व्हॉल्व दुरूस्तीचे कामामुळे बुधवारी पाणी पुरवठा बंद
कोल्हापूर : चंबुखडी टाकीवरून येणा-या मुख्य गुरूत्व वाहिनीवरील व्हॉल्व दुरूस्तीचे काम बुधवार, दि 10 मे 2023 रोजी होती घेण्यात येणार आहे. या मुख्य गुरूत्वहिनीवरून होणारा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद होणार असलेने बालिंगा जल उपसाकेंद्रावर अवलंबून असणा-या भागामध्ये बुधवारी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहिल व गुरूवार दि.11 मे 2023 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नित उपनगरे व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, तुळजा भवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी डी वॉर्ड दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवलक्लब तसेच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागातील नागरीकांना पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.