कोरगावकर पेट्रोल पंपास उच्चांकी विक्रीचा बहुमान कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली पुलाची सांगली फाटा येथील ए. जी कोरगावकर पेट्रोल पंपास सन २०२२-२३ सालामध्ये उच्चांकी इंधनाची विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलिमच्या डीलर्सची बैठक नुकतीच येथील सयाजी हॉटेलमध्ये पार पडली . यावेळी बहुसंख्य डीलर्स उपस्थित होते. कोरगावकर पेट्रोल पंपास सलग ९ वर्षे हा पुरस्कार मिळत आहे. …