
no images were found
आयकर पात्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना टॅक्स रिजिम 10 जूनपर्यंत कळविण्याचे आवाहन
कोल्हापूर : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांसाठी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्यासाठी योग्य असणारा न्यू टॅक्स रिजिम (New Tax Regime) व ओल्ड टॅक्स रिजिम (Old Tax Regime) पर्याय निवडावा व निवडलेला पर्याय to.kolhapur@zillamahakosh या ईमेल आयडीवर किंवा कोषागार कार्यालय येथे निवृत्तीवेनतधारकाचे नाव, बँक, ब्रँच, पीपीओ याची माहिती दिनांक 10 जून 2023 पूर्वी सादर करावी, असे आवाहन कोषागार अधिकारी आश्विनी नराजे यांनी केले आहे.
निवडलेल्या टॅक्स रिजिम (Tax Regime) नुसार देय होणारी TDS वजाती करण्यात येणार आहे. आयकर विभागाच्या वसुलीचे नवीन Section 115 BAC नुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या आयकर गणनेसाठी न्यू टॅक्स रिजिम (New Tax Regime) व ओल्ड टॅक्स रिजिम (Old Tax Regime) असे दोन प्रकार ठेवण्यात आले आहेत. ओल्ड टॅक्स रिजिम निवड केली असल्यास दि. 30 ऑक्टोबर 2023 पूर्वी गुंतवणुकीची छायांकित प्रत सादर करावी. जे आयकरपात्र निवृत्तीवेतनधारक टॅक्स रिजिम ची निवड वेळेत कळवणार नाहीत त्यांची न्यू टॅक्स रिजिम मध्ये TDS वजाती करण्यात येईल, असेही कोषागार कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.