no images were found
कर्नाटक जनतेनं मोदी-शहांना नाकारल, संजय राऊत कडाडले
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, भाजपा आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं आकडेवारीवरून कळत आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजवर चांगलीचं टीका केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. कर्नाटकातील जनतेनं मोदी-शहा यांना झिडकारलं आहे, हे या निकालातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्रातील नेते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. कर्नाटकातील निकाल 2024 साठी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सत्तेचा दरवाजा उघडणारा असणार आहे. 2024 साठी असाच निकाल असेल. जनतेच्या ‘मन की बात’ या निमित्तानं समोर आली आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
कर्नाटकात कोणतीच स्टोरी चालली नाही. फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली. कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली सत्याच्या बाजूने आले. हा मोदी आणि शाह यांचा पराभव झाला. मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पराभव समोर आल्याने त्यांनी बजरंबलीला निवडणुकीत आणले. पण बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली, असा हल्लाच त्यांनी चढवला.