no images were found
“सिएटलमध्ये असताना मला माझ्या मुलाच्या मदतीने एक दृश्य चित्रित करावे लागले.”-पुनीत इस्सार
सोनी सबवरील ‘वंशज’ ही मालिका महाजन कुटुंबातील तीव्र संघर्षाचे चित्रण करते. हा संघर्ष प्रामुख्याने वारसा हक्काशी निगडीत संकेतांशी संबंधित आहे. या कौटुंबिक नाट्याच्या केंद्रस्थानी आहे युविका महाजन (अंजली तत्रारी) जिचा संघर्ष दिग्विजय म्हणजे डीजे महाजन (माहिर पांधी) या आपल्या चुलत्याशी आहे. डीजे महाजन साम्राज्य हस्तगत करण्यासाठी उतावळा झाला आहे. या मालिकेत अभिनेता पुनीत इस्सार कुटुंब प्रमुख भानूप्रताप महाजनच्या भूमिकेत आहे, ज्याला त्याच्या घरची मंडळी प्रेमाने दादा बाबू म्हणून संबोधतात.
अलीकडेच मालिकेतून एक विश्रांती घेऊन पुनीत इस्सार सिएटल येथे आपल्या मुलाच्या घरी गेला होता, त्यावेळी एक अनपेक्षित परिस्थितीला त्याला सामोरे जावे लागले. तो परदेशी असताना मालिकेतल्या एका महत्त्वाच्या दृश्यात त्याची उपस्थिती आवश्यक होती. त्यामुळे प्रॉडक्शन टीमने त्याला त्याच्या फोनचा उपयोग करून परदेशातच एक दृश्य शूट करण्याची विनंती केली. या दृश्यात दादाबाबू डीजेची आई गार्गी (परिणिता सेठ) आणि वडील धनराज (गिरीश सचदेव) यांना व्हिडिओ कॉल करून अशी विनंती करतात की त्यांनी डीजेला युक्ती (अंजली तत्रारी)ची माफी मागायला सांगावे, जेणेकरून परिस्थिती विकोपाला जाणार नाही. सारे काही व्यवस्थित पार पडले, कारण मालिकेत देखील दादाबाबू अमेरिकेत असल्याचाच प्रसंग आहे. शूटिंगचे आव्हान स्वीकारून पुनीत इस्सारने स्वतःच स्वतःचा मेकअप केला आणि दादाबाबूंच्या व्यक्तिरेखेत शिरून आपल्या मुलाच्या मदतीने एक दृश्य चित्रित केले.
दादा बाबूंची भूमिका करणारा पुनीत इस्सार म्हणतो, “दैनिक मालिका करताना अभिनेत्यांकडून मोठ्या समर्पणाची अपेक्षा असते. सिएटलमध्ये असताना स्वतःच स्वतःचे दृश्य चित्रित करणे हे माझ्यासाठी आगळेवेगळे आव्हान होते. माझ्या मुलाने मला हे दृश्य चित्रित करण्यासाठी मदत केली. माझ्या मुलाने माझे दृश्य चित्रित केल्याची एक सुंदर आठवण देखील त्या निमित्ताने मला निर्माण करता आली. या दृश्यात दादाबाबू व्यक्तिगत कारणाने अमेरिकेस गेलेले असताना व्हिडिओ कॉल द्वारे महाजन कुटुंबाशी बोलताना दाखवले आहेत. एकंदरित, माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. कारण आजवरच्या माझ्या प्रदीर्घ कारकिर्दीत माझे दृश्य मी स्वतः कधीच चित्रित केले नव्हते.”