no images were found
डीकेटीई टेक्स्टाईलमधील १२ विद्यार्थ्यांची वर्धमान कंपनीत उच्च पॅकेजवर निवड
इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. इन टेक्स्टाईल्सच्या १२ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड, लुधियाना, पंजाब या नामांकीत कंपनीमध्ये प्लेसमेंट व्दारे निवड झाली आहे.
वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही एक देशभरात विख्यात कंपनी असून त्यांचे एकूण २२ हून अधिक उत्पादने आहेत. भारतात गुजराथ, मध्यप्रदेश, पंजाब अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या शाखा असून यामधून ते यार्न, ग्रे ऍन्ड प्रोसेस फॅब्रिक, सुईंग थे्रड आणि ऍक्रॅलिक फायबर इ. उत्पादनांची निर्मिती करतात.निवड झालेले विद्यार्थी विवेक मंगसुळे, अभिषेक कुणके, प्रज्योत पाटील, सत्यम पाटील, पार्श्व भांगडे, मोहसिनअहमद आगा, प्रतिक चौगुले, महमंदजनैद शिकलगार, ॠतिक कंदुरकर, अजय पाटील, सोहेल मुजावर, निजाम शेख हे सर्व अंतिम वर्ष टेक्स्टाईलचे शिक्षण संपादन करीत आहेत.
तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील कमलकिशोर चौधरी, संदेश पिंगट, अदित्य बुक्का, सुजल कदम, यश जाधव, अदित्य कांबळे, सतीश कुंभार, शुभम खोत, आकाश पाटील, मयुरेश मगदुम, अंजली पांढरे या ११ विद्यार्थ्यांची विद्यावेतनावर इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. डीकेटीईचे उत्तमोत्तम विद्यार्थी सर्वप्रथम घेता यावेत यासाठी कंपन्यातही चढाओढ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्री प्लेसमेंट ऑफर्स देणा-या कंपनीच्या संख्येतही भर पडू लागली आहे. यामुळेच बारावीनंतर इंजिनिअरींग क्षेत्रातील एक सर्वोत्तम पर्याय म्हणून विद्यार्थी टेक्स्टाईल्सकडे आकर्षित होत आहेत.
विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवरती नोकरीच्या संधी उपलब्ध करुण देण्यास डीकेटीई ही संस्था अग्रेसर आहे. इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरऍक्शनमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या इंटरव्हयूवच्या वेळी आपली गुणवत्ता सिध्द करता येत आहे व यामुळे येथील विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये आपली छाप पाडत आहेत असे गौरवोउदगार याप्रसंगी मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केले.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे , उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.