no images were found
शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन पाळण्यात आला.
दहशतवाद व हिंसाचारविरोधी पाळण्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवणे, देशासाठी व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या त्याग व बलिदानाचा सन्मान करणे तसेच भावी पिढीच्या मनात देशाच्या प्रगतीसाठी व संरक्षणाप्रति जागरूकता निर्माण करणे असा हेतू आहे.
आज शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील लॉनमध्ये दहशतवाद व हिंसाचारविरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आयक्यूएसी संचालक डॉ.सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. प्रकाश बिलावर, अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञान अधिविभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक अमोल कुलकर्णी यांनी सर्वांना शपथ दिली.