
no images were found
सांगलीत इन्फ्रा.मार्केटचे एएसी ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लाँचिंग
सांगली : बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालवणाऱ्या इन्फ्रा.मार्केट पुण्यातील तळेगाव आणि सांगलीतील शिराळा येथे ग्रेड १ दर्जाचे एएसी ब्लॉक प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तम दर्जाचे एएसी ब्लॉक्स तयार करण्यासाठी या कारखान्यांमध्ये अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय उत्पादन उपकरणांचा वापर केला जाईल, जे उद्योगातील सर्वात टिकाऊ आणि किफायतशीर बांधकाम साहित्यांपैकी एक बनले आहेत.
एएसी ब्लॉक प्लांट्स शहराच्या मध्यभागी आणि पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण प्रदेशाच्या आसपासच्या भागात सहज उपलब्ध व्हावेत यासाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहेत. तळेगाव आणि शिराळा प्लांटची उत्पादन क्षमता अनुक्रमे २० हजार घन ब्लॉक मीटर व ११ हजार घन ब्लॉक मीटर प्रति महिना आहे. इन्फ्रा.मार्केट विपुल प्रमाणात असलेली मागणी याद्वारे पूर्ण होते. ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने संपूर्ण भारतामध्ये आपल्या कार्याचा विस्तार करण्याची आणि सर्व आकाराच्या एएसी ब्लॉक्सची निर्मिती करण्याची योजना आखली आहे. नवीन क्षमतांमुळे रोजगाराच्या संधीदेखील निर्माण होतील ज्याचा फायदा जवळपासच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये राहणार्या लोकांना करता येईल.