Home आरोग्य राज्यात थंडीची हुडहुडी आणखी वाढणार…

राज्यात थंडीची हुडहुडी आणखी वाढणार…

0 second read
0
0
139

no images were found

राज्यात थंडीची हुडहुडी आणखी वाढणार…

यंदा पावसाने सुरुवात उशिरा करत पुढील मुक्काम वाढवल्यामुळे थंडीही जास्त प्रमाणात वाढण्याचा अंदाज होताच. अंदाजाप्रमाणे सध्या थंडीचा कडाका जाणवू लागलेला आहे. राज्यातील जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर आणि सांगली या ठिकाणचा पारा घसरला आहे. थंडीचा जोर वाढतच असून  शुक्रवारी झालेल्या तापमानाच्या नोंदीनुसार हे सध्याच्या काळातील नीचांकी तापमान आहे. अजूनही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असले तरीही यंदा महाबळेश्वर पेक्षाही राज्यातील जळगाव शहरात नीचांकी तापमान दिसते. महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमान तर त्यापेक्षा जळगावमध्ये काल 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस वर तापमान पोहोचले. महाबळेश्वरपेक्षाही नाशिक आणि पुण्याचे तापमानाची पातळी खाली राहिलेली दिसते. राज्यातील थंडीचा कडाका वाढतच चाललेला असून अजूनही वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…