Home क्राईम स्विफ्ट – वॅगन आर कार भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

स्विफ्ट – वॅगन आर कार भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

1 second read
0
0
100

no images were found

स्विफ्ट – वॅगन आर कार भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

या अपघतातील गंभीर जखमींना बाहेर काढण्यात यश आले परंतु ४ जणांनी जागीच प्राण गमावले.

औरंगाबाद :  शुक्रवारी रात्री कायगाव (औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर) येथे स्विफ्ट आणि वॅगन आर कारची समोरासमोर धडक होऊन अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. पोलिसांना दुर्घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी  अपघातग्रस्त वाहनांतून जखमींना बाहेर काढले. परंतु गंभीररीत्या जखमी झालेल्या चौघांनी जागीच प्राण सोडले. अपघातातील अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

अपघातात पुढील ४ जण मृत्युमुखी पडले :-  १. रतन शांतीलाल बेडवाल (वय ३८), २. सुधीर पाटील (५०), ३. रावसाहेब मोठे (५०), ४. भाऊसिंग गिरासे (४५).

तसेच शशीकला भाऊराव कोराट (७०), सिद्धार्थ जंगले (१४), हेमंत जंगले (५५), छाया हेमंत जंगले (३५), कुंतला दिगंबरराव जंगले (७०, रा. अमरावती) हे ५ जण जखमी आहेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…