no images were found
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीनी वसतीगृहामध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीनी वसतीगृह, समाजशास्त्र अधिविभाग, बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि सकाळ अॅग्रोवन संलग्र शैक्षणिक संस्था
एस.आय.आय.एल.सी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीनी वसतीगृहातील विद्यार्थीनींसाठी ‘कृषी व्यवसाय व फूड प्रोसेसिंग उद्योग’ या विषयावर
एकदिवसीय कार्यशाळा दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 06.00 वाजता शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीनी वसतीगृह याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या
कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. अमोल बिरारी, कृषी विभाग प्रमुख, एस.आय.आय.एल.सी, पुणे आणि सौ. गंधाली दिंडे उद्योजिका व फूड प्रोसेसिंग तज्ञ, कोल्हापूर
हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रा. डॉ. प्रतिमा पवार, चिफ रेक्टर, विद्यार्थ्यांनी वसतीगृह आणि अधिविभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केले.
याप्रसंगी वक्ते म्हणून श्री. अमोल बिरारी मार्गदर्शन करत असताना, भारतामध्ये शेती क्षेत्रात असणाऱ्या विविध संधीबाबत त्यांनी सांगितले. शेतीमधील संधी मिळविण्यासाठी विविध कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत हे देखील यावेळी ते म्हणाले. सौ. गंधाली दिंडे यांनी देखील वक्ते म्हणून अन्नप्रक्रिया क्षेत्रातील असणाऱ्या विविध संधीची विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. श्री. तुषार राऊत हे यशस्वी उद्योजक असून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. कविता वडराळे, रेक्टर, विद्यार्थीनी वसतीगृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी मानले. यावेळी डॉ. श्रीमती पी. बी. देसाई, समन्वयक, बेटी बचाओ अभियान, डॉ. विद्या चैगुले, रेक्टर, विद्यार्थीनी वसतीगृह, श्री. स्वप्निल साखरे, स्वप्निल मानगावे त्याचबरोबर वसतीगृहातील विद्यार्थीनीनी उपस्थिती दर्शवली. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन सुष्मा निहारकर यांनी केले.