Home शैक्षणिक दूरशिक्षणची विद्यार्थिनी सुप्रिया बडवे करताहेत महिलांचे सबलीकरण

दूरशिक्षणची विद्यार्थिनी सुप्रिया बडवे करताहेत महिलांचे सबलीकरण

0 second read
0
0
31

no images were found

दूरशिक्षणची विद्यार्थिनी सुप्रिया बडवे करताहेत महिलांचे सबलीकरण

कोल्हापूर: येथील शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील अर्थशास्त्र विषयातून द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी सौ.सुप्रिया सतिश बडवे यांनी महिला सबलीकरणामध्ये मोलाचे योगदान देत आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बडवे यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दूरशिक्षण केंद्राकडून प्राप्त झाली.शिक्षणापासून वंचित असणाऱ्या महिलांना शिक्षणाबरोबर रोजगार प्राप्त होणे गरजेचे आहे. हे ओळखून त्यांनी सर्वप्रथम अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे.त्या अनुषंगाने त्या आत्ता शिक्षण घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील कामेरी (ता.वाळवा) येथील रहिवाशी असणाऱ्या सुप्रिया बडवे यांनी पंचक्रोशीतील महिलांना स्वावलंबी जीवनाचे धडे देत आहेत.यासाठी एम.ए.अर्थशास्त्र भाग १ मध्ये शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमात कौशल्यावर आधारित असणाऱ्यां पेपरचाच आधार घेऊन महिलांना रोजगाराभिमुख कौशल्यदेण्यावर त्यांनी भर दिला.
सौ.बडवे यांनी महाराष्ट्र शासनाच्या उमेद या अभियानच्या माध्यमातून व सांगली जिल्हा समन्वयक आशितोष यमगर यांच्या सहकार्याने स्वयंसिद्धी बचत गटाची स्थापना करून महिलांना आत्मसन्मान प्राप्त करून देण्याचे काम करीत आहेत.आसपासच्या गावातील अनेक बचत गट स्वयंसिद्धी बचत गटाशी सलग्न झाले आहेत.यामध्ये दीडशे हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत.त्यामुळे यांना उद्योगाच्या नवनवीन संकल्पना बरोबर पर्यावरणाचे धडे ही दिले जातात.त्याचाच एक भाग म्हणून कापडी पिशवी शिलाई करण्याची चळवळ सौ.बडवे यांनी हाती घेतली आहे.यातून त्यांनी तीन लाख हून अधिक कापडी पिशवी शिलाई करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. रोजगाराबरोबर ज्ञानदान करण्यावर सौ.बडवे यांचा भर आहे.त्यासाठी त्यांनी जिजाऊ फौंडेशन नावाने वाचनालय सुरु केले आहे.या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत.अश्या कर्तृत्ववान विद्यार्थिनीचा दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपकुलसचिव श्री.सी.एस.कोतमिरे,अर्थशास्त्र सहा.प्राध्यापकडॉ.पी.पी.दावणे,डॉ.नितीन रणदिवे,श्री.वैभव पाटील,प्रसाद जाधव,श्रीमती संचिता कापडे उपस्थित होते.
‘सुप्रिया बडवे यांचे कार्य कौतुकास्पद व आदर्शवत आहे,विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समाजाभिमुख वरोजगाराभिमुख केल्यास निश्चितच समाजाचा सर्वांगीण स्तर उंचावेल.’ – प्रा.डॉ.डी.के.मोरे (संचालक, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र) ‘शिक्षण हे समाज बदलाचे साधन आहे.त्याचा उपयोग महिला सबलीकरणासाठी केल्यास महिला
स्वाभिमानी,स्वावलंबी बनण्यास वेळ लागणार नाही.त्यासाठी बचत गटाच्या व दूर शिक्षणाच्या माध्यमातून चळवळ उभी केली पाहिजे.यासाठी भविष्यात महिलांचा आर्थिक शाश्वत विकास यावर पीएच.डी.साठी संशोधन करण्याचा माझा मानस आहे’.-सुप्रिया बडवे (संचालिका, स्वयंसिद्धी बचत गट) चौकट, मागील वर्षी ‘हर घर तिरंगा’ या शासनाने चालविलेल्या अभियानात एक लाख तीस हजार तिरंगा ध्वज बनविले.याची शासनाने दखल घेऊन बडवे यांचा राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…