no images were found
पुण्याच्या खडकवासला धरणामध्ये ९ मुली बुडाल्या…
पुणे : पुण्याच्या खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या आहेत तर, ९ पैकी ७ मुलींना धरणातून बाहेर काढण्यात यश आले आहे.परंतु, दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. खडकवासल्या धरणात हवेली गावच्या हद्दीत पोहोण्यासाठी ९ मुली गेल्या होत्या. पण, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनास्थळी हवेली पोलीस दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला सुद्धा दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊस जवळ काही मुली आल्या होत्या. आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. पण त्याच ठिकाणी तेव्हा दशक्रिया विधीसाठी आलेल्या काही स्थानिकांच्या प्रसंगावधानामुले मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. स्थानिकांनी ९ पैकी ७ मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. परंतु, अद्यापही सोळा ते सतरा वर्षांच्या दोन मुलींचा शोध लागला नाही.
स्थानिकांनी या घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच खडकवासलाचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवालदार दिनेश कोळेकरांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.