
no images were found
अब्बासभाई तांबोळी यांना समाज भूषण पुरस्कार
ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजासाठी ठोस काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान समाजभूषण पुरस्कार देऊन करण्यात आला. माळीनगर येथील अब्बास अहमद तांबोळी यांना धैर्यशील राजसिंह मोहिते- पाटील व किशोरसिंह माने पाटील यांच्या शुभहस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अब्बासभाई तांबोळी यांनी अकलूज मधील रत्नाई पार्क वसाहतीच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिलेले आहे. अब्बासभाई यांनी समाजाच्या वधू- वर सूचक मेळाव्यातून अनेक लग्नाच्या गाठी बांधलेल्या आहेत. मौलाना अब्दुल कलाम आझाद संस्थेच्या सचिव पदी काम करून अनेक सामाजिक उपक्रमाला त्यांनी हातभार लावलेला आहे. या कामाची नोंद घेत ताहेरा फाउंडेशनच्या वतीने अब्बासबाई तांबोळी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अकलूज पंचक्रोशी मध्ये त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे