
no images were found
मुरगूड : येथील सुवर्ण महोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकरी पतसंस्थेच्या ३ हजार ३०० सभासदांना सुमारे ४० लाखांच्या दिवाळी भेटवस्तू व ५० सेवकांना १३ लाखांवर दिवाळी बोनस वितरणाचा कार्यक्रम मुरगूड येथील मुख्य शाखेत सभापती श्री. अनंत फर्नांडीस, उपसभापती विनय पोतदार, ज्येष्ठ संचालक श्री. पुंडलिक डाफळे, संचालक श्री. किशोर पोतदार, श्री. दत्तात्रय तांबट यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सर्व सभासदांना प्रत्येकी कं. गोल्ड विनर ५ लिटर खाद्यतेल व कं. मोहक १ कि. तूप सभासद दिवाळी भेटवस्तू तर कायम व हंगामी अशा ५० सेवकांना पगाराच्या २५ टक्के बोनस वितरण करण्यात आले. याशिवाय गेल्या आर्थिक वर्षाच्या १ कोटी ९७ निव्वळ नफ्यावर, सभासदांना १५ टक्के लाभांश वात्पापोती २३ लाख २२ हजार रुपयांचे वाटपही करण्यात आले. अशा प्रकारे सभासद दिवाळी भेट वस्तू (४० लाख) सेवक बोनस (१३ लाख) व लाभांशापोटी (२३ लाख २२ हजार) असे एकूण सुमारे ७६ लाख ४७ हजारांवर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संचालक सर्वश्री संस्थापक संचालक जवाहर शहा, दत्तात्रय तांबट, पुंडलिक डाफळे, रविंद्र खराडे, किशोर पोतदार, सौ, सुनिता शिंदे, सौ. सुनिता सुतार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, दत्तात्रय कांबळे, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे व श्रीमती भारती कामत यांच्यासह कार्य्लाक्ष्मी संचालक श्री नवनाथ डवरी, सचिव मारुती सणगर, मुख्य मुरगुडचे शाखाधिकारी सौ. मनीषा सूर्यवंशी अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.