
no images were found
चक्क हापशातून पाण्याऐवजी येतेय दारू, हा निसर्गाचा चमत्कार की..
गुना : इथल्या एका हपशातून पाण्याऐवजी चक्क दारू येत आहे. पोलिसांनी जेव्हा हापसा हापसला तेव्हा त्यातून पाणी नाही तर दारु बाहेर पडली. हपशातून पाणी नाही तर दारू बाहेर यायला लागली म्हटल्यावर ते पहायला मोठी गर्दी उसळली.
हापशातून निघणाऱ्या दारुचे व्हिडिओ सोशल मीडियावर दणकावून व्हायरल झाले. सर्व राज्यात हा कौतुकाचा विषय झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या दारुचे रहस्य बाहेर आले.
गुना जिल्ह्यात पोलिसांना एका ठिकाणी अवैध दारु तयार होत असल्याचे कळाले. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापेमारी केली. छापेमारी दरम्यान त्यांना या ठिकाणी खबऱ्याने सांगितल्याप्रमाणे एक हँडपंप दिसला. हा हँडपंप वेगळा असल्याचे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सूटले नाही.
पोलिसांनी हा हापसा सुरु केल्यावर त्यातून पाणी नाही तर दारू बाहेर आली. पोलिसांनी जिथे हापसा होता, ती जागा खोदून काढली. तेव्हा त्यांना खाली मद्याचे अनेक ड्रम मिळाले. जमिनीपासून ते 7 फूट खोल गाडण्यात आले होते.या ड्रममध्ये दारू साठवण्यात आली होती.गुना जवळ हा अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला.