Home शासकीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

18 second read
0
0
29

no images were found

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

 

पुणे : अनेक वर्षांनंतर सकाळच्या सत्रात होणार्‍या सन 2022-23 व 2023-24 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील पुरस्कारार्थींचे पुण्यात आगमन झाले असून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज समारंंभाच्या तयारीची पहाणी केली. यंदाचा पुरस्कार सोहळा हा दिमाखदार आणि ऐतिहासिक असेल असे पहाणी दौर्‍यात मंत्री भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे शुक्रवारी 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता  शानदार समारंभात वितरण होणार आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात हा सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे.

भव्य स्वरूपात होणार्‍या पुरस्कार समारंंभाच्या तयारीची पहाणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली. यावेळी क्रीडाआयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहणीनंतर  क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारात प्रथमच नारीशक्तीचा गौरव होत आहे. ऑलिम्पिक, विश्वकरंडक, आशियाई, राष्ट्रकुल पदक विजेते क्रीडापटू थेट पुरस्काराने सन्न्मानित होणार आहे. योग खेळाला प्रथमच पुरस्कार दिला जातोय. यामुळे हा पुरस्कार ऐतिहासिक आणि दिमाखदार असणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार समारंभ सर्वांसाठी खुला असून  एका ऐतिहासिक सोहळयाचे आपण साक्षीदार व्हा असे आवाहनही क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  यांनी केले आहे.

सन 1995 नंतर सकाळच्या सत्रात पुरस्कार समारंभ असल्याने पुण्याबाहेरील  पुरस्कार्थीची निवास व्यवस्थाही बालेवाडीत करण्यात आली आहे. पुणे जिल्हा बाहेरील पुरस्कार्थीचे आगमन संध्याकाळपासून सुरू झाले होते. भव्य व्यासपीठाचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते.  या समारंभाचे लाईव्ह प्रेक्षपण क्रीडा विभागाच्या स्पोर्टस् महाराष्ट्र या यूटयुब चॅनेल व फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे.

. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह  उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार,  खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  असे 5 परिशिष्टात हा पुरस्कार देण्यात येतो. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी 3 लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

सन 2022-23 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदिप गंधे यांना जीवनगौरव, ऑलिम्पिक प्रशिक्षका सुमा शिरूर यांना जिजामाता, प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शक, राष्ट्रकुल पदक विजेता अविनाश साबळे यांचा समावेश आहे. सन 2022-23 वर्षासाठी एकूण 70 पुरस्कारांची घोषणा गतवर्षी करण्यात आली होती.

सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी,ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल,  जितेश शर्मा यांना जाहिर झाला आहे. सन 2023-24 वर्षासाठी एकूण 89 पुरस्काराची घोषणा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी केली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…