
no images were found
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा
पुणे, : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत.यावर्षी दिवाळी नंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे. परंतू, आतापासूनच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू करीत एकमेकांवर दबाव आणण्यास सुरूवात केल्याचे दिसून येतेय.विशेष म्हणजे या निवडणुका प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय शक्तीनूसार स्वबळावर लढवण्याच निर्णय घेईल,असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) केला.
महायुतीतील शिवसेनेने (शिंदे गट) यांनी काही निवडक शहरे सोडली तर इतर ठिकाणी युती होणार नाही हे जाहीर करून टाकत भाजप, राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती नकोय,असे पक्षाचे नेते बोलत आहेत.पंरतू,शिंदे गटाचा फार फायदा भाजपला होईल, याची शक्यता नाही. अशात मुंबई, ठाणे काय तर इतर ठिकाणी शिंदेची सेना भाजपसोबत नसली तरी भाजपला नुकसान होणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.
वमुंबई, ठाण्यात भाजपचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत थेट सामना शिवसेना (उबाठा) सोबत राहील. ठाण्यात भाजपला शिंदे गटाचा फायदा होईल.इतर महानगरांमध्ये भाजपची स्थिती भक्कम आहे.मुंबई महानगरपालिका यंदा भाजप भगवा फडकवण्याचा निर्धारानेच निवडणुक रिंगणात उतरणार आहे.अशात शिंदे यांची भाजपला कितपत मदत होईल, हे सांगता येत नाही. उलटपक्षी शिंदे यांना लक्ष करून उबाठा कडून आक्रमक प्रचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात मुंबईत भाजपने महायुती पेक्षा ‘एकला चलो रे’चे सुत्र अवलंबले तर उत्तम होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.इतर महानगरासह जिल्हा परिषदांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यास भाजप प्राधान्य देईल,असे भाकित पाटील यांनी वर्तवले.