Home मनोरंजन प्यार के लिए कोई उम्र की सीमा नहीं – झी टीव्हीवरील एक प्रेमकथा

प्यार के लिए कोई उम्र की सीमा नहीं – झी टीव्हीवरील एक प्रेमकथा

18 second read
0
0
7

no images were found

प्यार के लिए कोई उम्र की सीमा नहीं – झी टीव्हीवरील एक प्रेमकथा

 

भारतीय समाजात नातेसंबंध आणि लग्न हे साधारणपणे प्राचीन परंपरांनुसार ठरवले जातात जिथे वय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक पार्श्वभूमी यांना महत्त्व दिले जाते. परंतु प्रेम हे नियमांचे पालन करत नाही – ते स्वतःचा मार्ग ठरवते आणि आपल्या या प्रवासातील अडथळ्यांना पार करते. अनेक दशकांपासून झी टीव्ही वाहिनी कथाकथनामध्ये अग्रगण्य आहे आणि प्रेक्षकांसाठी विचारांना चालना देणाऱ्या, प्रचलित मान्यतांना आव्हान देणाऱ्या आणि नातेसंबंधांची नव्याने व्याख्या करणाऱ्या कथा सादर करत आली आहे. आता आपली नवीन मालिका ‘तुम से तुम तक’ सह ही वाहिनी सामाजिक परंपरांच्या पलीकडे जाणारी एक ताज्या दमाची आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा सादर करत आहे.

      ही मालिका मोठी स्वप्ने आणि चांगली मूल्ये असलेल्या एका 19 मध्यमवर्गीय मुलगी अनु आणि आपल्या शिस्त आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वावलंबी व्यावसायिक धनाढ्य 46 वर्षीय आर्यवर्धन यांच्यातील अनोख्या प्रेमकहाणीला सुंदरपणे दाखवेल. त्यांच्यातील वय, वर्ग, आणि जीवनशैलीत फरक असूनही प्रेम त्यांच्या हृदयांत आपला मार्ग शोधते आणि समाजातील प्रचलित नियमांना आव्हान देते.

        लोकप्रिय अभिनेता शरद केळकर आर्यवर्धनची भूमिका साकारत असून तो एका प्रभावशाली आणि तरीही विनम्र व्यवसायिकाच्या रूपात दिसून येईल जो आपली हुशारी, आकर्षकपणा आणि नम्रतेच्या जोरावर आदर कमावतो. त्याच्याकडे संपत्ती आणि प्रतिष्ठा असली तरी त्याची मूल्ये आणि नातेसंबंध त्याच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. तर दुसरीकडे निहारिका चौक्सी अनुची भूमिका जीवंत करत आहे. अनु एक उत्साही, सरळमार्गी आणि प्रेमळ मुलगी असून आपल्या परिवाराला एक चांगले भविष्य मिळावे हे तिचे स्वप्न आहे. ईमानदार आणि निर्धार पक्का असलेल्या ह्या मुलीसाठी प्रेमाचे मूल्य सर्वाधिक असले तरी आपल्या आयुष्यातील जबाबदाऱ्यांनाही ती नीट समजते. अनुच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे प्रेम असलेल्या लोकांवर असलेला तिचा विश्वास.

       ‘तुम से तुम तक’ ही मालिका एका जोडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा उबदारपणा आणि साधेपणा एका श्रीमंत कुटुंबाची भव्यता आणि सुसंस्कृतपणा यांची अतिशय सुंदर पद्धतीने तुलना करेल. आणि एक मार्मिक प्रश्नही उपस्थित करेल – काय प्रेम हे पिढ्‌या, सामाजिक अपेक्षा आणि सखोल रूजलेल्या परंपरा यांच्यातील अंतर कमी करू शकते?

निहारिका उत्साहात म्हणाली, “माझ्यासाठी या शोचा भाग बनणे खूपच रोमांचक आहे! ही एक ताज्या दमाची आणि हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा आहे – जे टेलिव्हिजनवर आपल्याला फारसे पाहायला मिळत नाही. ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने लिहिण्यात आली असून अगदी सुरूवातीपासूनच मी ह्या कथेकडे आकर्षित झाले. ही कथा अतिशय वेगळ्‌या पद्धतीने प्रेमाचा शोध घेते आणि अनुसारखी खास भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. ती उत्साही, स्वच्छंदी आणि अनेक बाबतीत अगदी माझ्याचसारखी आहे. सगळेच कलाकार आणि तंत्रज्ञ छान आहेत त्यामुळे सेटवरील प्रत्येक दिवस आनंदात जातो. शरद सरांसोबत काम करणे हा तर माझा सन्मानच आहे. ते एक उत्तम अभिनेता आहेत आणि आपल्या कलेबद्दलचे त्यांचे समर्पण अद्‌भुत आहे. आम्ही चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात केली असून आपल्या व्यक्तिरेखेची तयारी ते कसे करतात आणि त्यांची सहज स्क्रीन उपस्थिती अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकत आहे. प्रेक्षकांनी आमची ही मालिका पाहावी यासाठी मी अतिशय उत्सुक आहे आणि मी आशा करते ती बनवताना आम्हांला जेवढी आवडत आहे तेवढीच प्रेक्षकांनाही पाहताना आवडेल.”

      “तुम से तुम तक” प्रेक्षकांना प्रेम, द्वंद्व, आणि सामाजिक दबावांनी भरलेल्या एका भावनिक प्रवासावर घेऊन जाईल. काय अनु आणि आर्यवर्धन यांचं प्रेम काळाची कसोटी, कुटुंबाच्या अपेक्षा आणि जगाच्या बारीक नजरांना तोंड देऊ शकेल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…