no images were found
पवारांचा खास शिलेदार करणार भाजपात प्रवेश
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. अशातच आता काही दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे कमळ हाती घेणार आहेत. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार होते. भाजपकडून राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत (NCP) नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहणार नाही अशी पुरंदरमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती.अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसण्यात आली आहे. राष्ट्रवादीला त्यांच्याच बाल्लेकिल्ल्यात मात देण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टेकवडे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.