no images were found
CM एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ मागणी मान्य करणार का?
मुंबई : राजकीय वर्तुळामध्ये दररोज काही ना काही घडामोडी सुरूच असतात. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मागणी केली आहे.ती मागणी मुख्यमंत्री मान्य करणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. फडणवीस यांच्या मागणीवर एकनाथ शिंदे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आधीच भाजप आणि काँग्रेस आमने सामने असताना आता पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा गाजू शकतो. वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.
त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आणखी दोन मागण्या मुख्यमंत्री शिंदे मान्य करतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली होती.