
no images were found
मोदिजींच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा ७३ वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. मोदिजींच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. मा.मोदिजी अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गांच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. मोदिजींच्या या सेवाभावी कार्याबद्द्ल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने संपूर्ण देशभरात भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात “सेवा पंधरवडा” म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोल्हापूरच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात सविस्तर बैठक काल जिल्हा कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये मोदीजींच्या कार्याबद्दलची प्रदर्शनी, मोदी@२० बुक स्टोल, पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा पाठवणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, कोविड लसीकरण केंद्रावर सेवाकार्य, दिव्यांगांना कृत्रिम अवयव व वयोश्री योजनेची नोंदणी, व्होकल फॉर लोकल, बुद्धीजीवी सम्मेलन, स्वच्छ भारत अभियान, अमृत सरोवरच्या माध्यमातून नदी, तलाव स्वच्छता, जल हि जीवन जनजागृती, वृक्षारोपण, खादी प्रसार अशा विविध कार्यक्रमांबाबत पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सविस्तर चर्चा करून त्याचे नियोजन करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र.का.सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी मोर्चाचे पदाधिकारी यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यावेळी दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, राजू मोरे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, हितेंद्र पटेल, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राउत, अजित ठाणेकर, डॉ राजवर्धन, रविंद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, भरत काळे, प्रदीप पंडे, सुधीर देसाई, महेश यादव, अमर साठे, आजम जमादार, संदीप पाटील, रमेश दिवेकर यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.