Home राजकीय सुनील मोदी यांचा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज

सुनील मोदी यांचा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज

4 second read
0
0
5

no images were found

सुनील मोदी यांचा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज

कोल्हापूर(प्रतिनिधी):- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूरचे नगरसेवक सुनील मोदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते व कोल्हापूर लोकसभा संपर्कप्रमुख अरविंदभाई दूधवडकर, पुणे शहरप्रमुख व महाराष्ट्र राज्य संघटक वसंत मोरे, तसेच कोल्हापूर दक्षिण उपशहरप्रमुख युवराज खंडागळे यांच्यासह पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण ताकदीने, एकजुटीने आणि संघटितपणे लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचवून निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.सुनील मोदी यांच्या उमेदवारीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून, आगामी काळात प्रचाराला अधिक जोर येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील

उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील पुणे : गोकुळ निवडणुकीत महायुतीत एकवाक्यता नाही …