Home Uncategorized एमपीएसी आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न-हेमंत पाटील

एमपीएसी आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न-हेमंत पाटील

2 second read
0
0
6

no images were found

एमपीएसी आंदोलनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न-हेमंत पाटील :   

मुख्यमंत्रीनी अनेक मागण्या मान्य करूनही आंदोलन सुरू ठेवणे संशयास्पद

पुणे,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) कारभारातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गांभीर्याने भूमिका घेतली असताना पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय रंग देण्यात येत असल्याच आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केला.

विद्यार्थ्यांचे भविष्य राजकीय स्वार्थासाठी वापरू नका; सरकारच्या सकारात्मक निर्णयांना सहकार्य करून उर्वरित प्रश्न संवादातून सोडवावेत, असे आवाहन पाटील यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले, असा आरोप करणे वस्तुस्थितीला धरून नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत. एमपीएसी सचिवांची बदली, आयोगाच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी, ऑफलाइन परीक्षा सुरू ठेवण्याची भूमिका आणि मोठ्या प्रमाणावर सरकारी पदभरतीची घोषणा ही त्याची ठोस उदाहरणे आहेत.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी संवादाचा मार्ग उपलब्ध असताना आंदोलन अधिक तीव्र करण्यामागे नेमका हेतू काय, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या खऱ्या प्रश्नांवर आंदोलन झाले तर त्याचे स्वागतच केले पाहिजे; मात्र राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांना पुढे करून सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

एमपीएसी विद्यार्थ्यांच्या भावनांशी कोणत्याही राजकीय पक्षाने खेळू नये. सरकारनेही दोषींवर कठोर कारवाई करत भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेळबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मात्र घटनात्मक मर्यादा असलेल्या पदांबाबत राजकीय दबाव निर्माण करून नियमबाह्य निर्णयाची मागणी करणे योग्य नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील

उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील पुणे : गोकुळ निवडणुकीत महायुतीत एकवाक्यता नाही …