no images were found
सुगरण महिला गृहउद्योगातून 9 महिलांना रोजगार; वार्षिक 10 लाखांहून अधिक उलाढाल
कोल्हापूर, : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद उमेद बचतगटाच्या सुगरण महिला गृहउद्योगाला भेट देऊन गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. बचतगटाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या उद्योगातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
सुगरण महिला गृहउद्योगामार्फत विविध प्रकारच्या स्नॅक्सचे उत्पादन केले जाते. या उद्योगामुळे 9 महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळाला असून, बचतगटाची वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. स्थानिक पातळीवर उद्योग उभारून महिलांनी स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे.
बचत गटाला भेट देऊन उद्योगाची माहिती घेतल्यानंतर गटबांधणी, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठ विस्तार आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. बचतगटाच्या महिलांनी याच पद्धतीने उद्योगाचा विस्तार करून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी गटबांधणी व पुढील वाटचालीस गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.