Home Video डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश

डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश

14 second read
0
0
7

no images were found

डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश
इचलकरंजी(प्रतिनिधी):- डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा व बी.टेक. टेक्सटाईलमधील विद्यार्थ्यांनी ७व्या कस्तुरी श्रीनिवासन ट्रस्ट, कोईमतुर, तमिळनाडू यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन प्रश्‍नमंजुषा ‘टेक्स्टाईल क्विझ – २०२६’ या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून डिप्लोमा टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी व बी.टेक. टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षिस संपादन केले आहे. डिप्लोमाच्या गटाला रुपये २० हजार तर डीग्रीच्या गटाला रुपये २५ हजारचे पारितोषिक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
देशभरातील विविध राज्यांमधील महाविद्यालयांच्या डिप्लोमासाठी ३६ संघ तर डीग्रीसाठी ४७ संघातील एकूण १६५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत डीकेटीईच्या विद्यार्थ्याना द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
या प्रश्‍नमुजेषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची वस्त्रोद्योग तंत्रज्ञानाशी निगडीत स्पिनिंग, विव्हींग, प्रोसेसिंग आणि गारमेंट या वस्त्रोद्योगातील महत्वपूर्ण क्षेत्रांवर आधारित प्रश्‍नांच्या विविध फे-यांमधून विद्याथ्यार्ंच्या तांत्रिक ज्ञानाची, आकलनशक्तीची आणि तत्परतेची कसोटी घेण्यात आली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इतर महांविद्यालयातील संघांना प्रभावी टक्कर देत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक ज्ञान आणि गुणवत्ता सिध्द केली.
डिप्लोमा गटात मध्ये शिकणा-या अश्‍विन अबदान (डीटीएम), मलिकरेहान कलावंत (डीटीटी) तर बी.टेक. टेक्स्टाईल मधील रोहीत कुंभार (तृतीय वर्ष टेक्स्टाईल केमिस्ट्री) व ओंकार तुपतेवार (अंतिम वर्ष टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी) या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व दैदीप्यमान यश संपादन केले.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचप्रमाणे अशा विविध टेक्नीकल विषयांवर डीकेटीई विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे अयोजन करीत असते यामुळे विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळविणे सहज शक्य होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. या प्रश्‍नमुजेषेसाठी विद्यार्थ्यांना संचालिका डॉ सौ. एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, टेक्सटाईल विभागप्रमुख डॉ वाय.एम. इंडी, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा. आर. के. वळसंग, प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी, प्रा. आर.एल. गोटीपामुल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

मुस्कान बामने दिसणार नव्या अवतारात

मुस्कान बामने दिसणार नव्या अवतारात  सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल पुष्पा (करुणा पांडे)…