no images were found
ओडिशा सरकारने डब्ल्यूआयआय-अदाणी फाउंडेशनच्या ऑलिव्ह रिडले कासवांवरील अभ्यास प्रसिद्ध केला
डॉ. प्रीती अदाणी यांनी माझी सरकारच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले
भुवनेश्वर, : ओडिशा सरकारच्या वन, पर्यावरण व हवामान बदल तसेच कामगार व ईएसआय विभागाचे राज्यमंत्री श्री गणेश राम सिंह खुंटिया यांनी देहराडून स्थित वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तीन वर्षांच्या संशोधन प्रकल्पाचा पहिल्या वर्षाचा अहवाल जारी केला. या संशोधनात सॅटेलाइट टेलिमेट्री, बोटीद्वारे करण्यात आलेले सर्वेक्षण आणि समुद्रकिनाऱ्याच्या अभ्यासाचा वापर करण्यात आला. यामधून ऑलिव्ह रिडले कासव ओडिशाच्या समुद्रकिनारी भागातील पाण्यात आणि अंडी घालण्याच्या ठिकाणी कशा प्रकारे वावरतात, याचा अभ्यास करण्यात आला.
ओडिशाच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या हालचाली आणि अंडी घालण्याच्या ठिकाणांचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी हा संशोधन प्रकल्प ओडिशा वाइल्डलाइफ ऑर्गनायझेशन, वन, पर्यावरण व हवामान बदल विभाग, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) चा भाग असलेली धामरा पोर्ट कंपनी लिमिटेड (DPCL) आणि अदाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात आला. या कार्यक्रमाला अदाणी समूहाच्या सामाजिक कल्याण आणि विकास क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अदाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. अभिषेक लखटकिया उपस्थित होते.
ओडिशामध्ये जगातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या महत्त्वाच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांपैकी काही ठिकाणे आहेत. यामध्ये केंद्रपाडा जिल्ह्यातील गहीरमाथा आणि गंजाम जिल्ह्यातील रुशिकुल्या यांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी येतात. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची-1 अंतर्गत या कासवांना भारतात सर्वाधिक कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.
या अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गहीरमाथा भागात प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. तसेच गहीरमाथा आणि रुशिकुल्या येथे कासवांना सॅटेलाइट टॅग लावण्यात आले. ओडिशामध्ये APSEZ मार्फत धामरा आणि गोपालपूर बंदरांचे संचालन केले जाते.
WII च्या एंडेंजर्ड स्पीशीज मॅनेजमेंट विभागाचे सीनियर साइंटिस्ट डॉ. आर. सुरेश कुमार यांनी सांगितले, “जवळपास 15 वर्षांनंतर ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवांचे सॅटेलाइट ट्रॅकिंग पुन्हा सुरू झाले आहे. ओडिशा वन विभाग, धामरा पोर्ट आणि अदाणी फाउंडेशन यांच्या सहकार्यामुळे या कासवांच्या हालचाली आणि अधिवासाबाबत नवीन माहिती मिळवता आली आहे. या निष्कर्षांमुळे वैज्ञानिक माहितीच्या आधारे संवर्धनाचे नियोजन करण्यास मदत होईल. अधिक कासवांचे ट्रॅकिंग सुरू ठेवून आम्ही अधिक मजबूत माहिती संकलित करणार आहोत. यामुळे भविष्यातील संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास मदत होईल.”
अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती जी. अदाणी म्हणाल्या, “ऑलिव्ह रिडले कासव हे ओडिशाच्या नैसर्गिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या प्रवासाचा अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. WII च्या वैज्ञानिक कार्याला सहकार्य करून संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये योगदान देताना आम्हाला आनंद होत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशा सरकार पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासावर देत असलेला भर अशा महत्त्वपूर्ण संशोधनासाठी मजबूत आधार देतो. या प्रयत्नात योगदान देताना आम्हाला आनंद होत आहे.”
सॅटेलाइट ट्रॅकिंगमधून ऑलिव्ह रिडले कासवांच्या नर आणि मादीमध्ये हालचालींचे वेगवेगळे पॅटर्न दिसून आले. नर कासवांनी समुद्राच्या दिशेने स्थलांतर लवकर सुरू केले, तर मादी कासव अधिक काळ किनाऱ्याजवळील पाण्यात राहिल्या. या माहितीवरून समुद्राच्या खंडीय शेल्फजवळ आणि बंगालच्या उपसागरात कासव काही ठिकाणी अन्न शोधण्यासाठी थांबत असल्याचेही दिसून आले.
एका मादी कासवाने 271 दिवसांत 6,719 किलोमीटरचा प्रवास केला आणि श्रीलंकेच्या पूर्वेकडील समुद्रापर्यंत पोहोचले. आणखी एका कासवाने गहीरमाथापासून रुशिकुल्यापर्यंत आणि पुन्हा परत असा जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास केला. यावरून ऑलिव्ह रिडले कासवे ओडिशाच्या किनारपट्टीवरील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाल करतात हे दिसून आले.
2025-26 च्या अंडी घालण्याच्या हंगामात बोटीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1,390 ऑलिव्ह रिडले कासव आणि 67 कासवांच्या जोड्या आढळल्या. यातील बहुतांश कासवे किनाऱ्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरात आढळली. कासवांच्या हालचाली आणि अधिवासाच्या वापराचा त्यांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांच्या संवर्धनावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी नियमितपणे निरीक्षण सुरू ठेवण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
या संशोधनामुळे ओडिशामध्ये अदाणी फाउंडेशनकडून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामाला आणखी बळ मिळाले आहे. तसेच अदाणी समूहाच्या पर्यावरणीय शाश्वततेवरील व्यापक प्रयत्नांनाही यामुळे हातभार लागला आहे. 20 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान झालेल्या क्लायमेट वीक न्यूयॉर्कमध्ये अदाणी समूहाने सहभाग घेतला आणि हवामान कृती तसेच अधिक शाश्वत ऊर्जा भविष्याच्या दिशेने होणाऱ्या जागतिक चर्चेत योगदान दिले.
अदाणी फाउंडेशन गेल्या जवळपास दशकभरापासून ओडिशामध्ये काम करत आहे. त्याच्या विविध उपक्रमांचा लाभ सात जिल्ह्यांमधील 283 गावांपर्यंत पोहोचला आहे. फाउंडेशनच्या कामामध्ये शिक्षण व शिष्यवृत्ती, वेलनेस सेंटर, मोबाईल मेडिकल युनिट्स आणि विशेष आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा तसेच शेतकरी, महिला आणि युवकांसाठी रोजगार व उपजीविका कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि ग्रामीण विद्युतीकरणाच्या उपक्रमांद्वारे फाउंडेशनने स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासालाही मदत केली आहे.