Home Video कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.        

कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.        

22 second read
0
0
4

no images were found

कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.        
        कोल्हापूर ( प्रतिनिधी):- कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण देखावा बनवला जातो .यावर्षी सुद्धा मंडळाच्या वतीने ऐतिहासिक अमरनाथ गुफाची हुबेहू प्रतिकृती साकारण्यात आली. ही गुफा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आपण जणू अमरनाथ मध्येच असल्याचा भास होईल, इतक्या उत्तम पद्धतीने ही गुफा साकारली आहे. त्याचा शुभारंभ 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे .अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नितीन घाडगे आणि उपाध्यक्ष अक्षय पाष्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.                  कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील मस्कुती तलाव तरुण मंडळा तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा विषयक उपक्रमाबाबत या मंडळाची सर्वत्र ख्याती आहे .गणेशोत्सवामध्ये वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर करण्याची परंपरा असलेल्या या मंडळांना यावर्षी अंबरनाथ गुफाचा देखावा बनवला. कोल्हापूर शहरात प्रथमच अशा प्रकारची अमरनाथ गुफा बनवण्याचे अध्यक्ष नितीन गाडगे यांनी सांगितले. या गुफी ची लांबी सुमारे 60 फूट इतके असून या मध्ये ठिकठिकाणी खऱ्या बर्फाचा अनुभव नागरिकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे खऱ्या बर्फापासून शिवलिंग बनवण्यात आले आहे .या देखाव्यामध्ये सुमारे वीस फुटाचा झुलता पूल बांधण्यात आला आहे. याशिवाय मनमोहक धबधबा आणि पाण्याची तळे त्यात बदके आणि मासे सोडण्यात आले आहेत .एकूणच अमरनाथ गुफाच्या ठिकाणी भाविकांना जसा अनुभव येतो ,तसा वास्तव अनुभव देण्याचा प्रयत्न मस्कुटी तलाव तरुण मंडळाने केला आहे .तसेच पर्यावरणाचे भान राखत देखावा मध्ये कोणतेही प्रकारची बांधकाम न करता केवळ लाकडाच्या सहाय्याने आणि इतर पूरक वस्तूंचा वापर करत हा देखावा साकारला आहे. तसेच देखावा पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेची ही काटेकोर उपाय योजना मंडळांनी अवलंबले आहे .ही गुफा तयार करण्यासाठी एक महिना दहा दिवस लागले. विशेष म्हणजे सर्व देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या श्रमदानातून पूर्ण केला आहे, अशी अध्यक्ष नितीन घाडगे आणि अक्षय पाष्टे यांनी सांगितले .या देखाव्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते सोळा सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता देखाव्याचा शुभारंभ होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी हार तुरे न आणता शालेय साहित्य आणि वह्या आणण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. हे साहित्य परिसरातील शैक्षणिक संस्थांना दिले जाते, तसेच मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, महिलांसाठी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि गरजू कुटुंबांना मदत केली जाते .आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या पट्सोंगट्यांच्या खेळाला या मंडळाने नवजीवन दिले आहे .हा खेळ पुन्हा सुरू करून तो महाराष्ट्राबरोबर कर्नाटक पर्यंत नेण्याचे काम मंडळाने केले आहे .नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी 19 ते 24 सप्टेंबर या कालावधी सायंकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उपस्थित रहावl असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष घाडगे यांनी केले .यावेळी मंडळाचे सचिव फत्तेसिंह दिवेकर , खजानिस यूवराज गोरमकर, आशिष गौरी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती तलाव तरुण मंडळाचा आकर्षक देखावा.  

कोल्हापुरात प्रथमच साकारलीय श्री अमरनाथची  गुफा.         मस्कुती …