Home Video हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान करणार्‍या बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरवीरांचे स्मरण करण्यासाठी ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !

हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान करणार्‍या बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरवीरांचे स्मरण करण्यासाठी ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !

14 second read
0
0
5

no images were found

हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान करणार्‍या बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरवीरांचे स्मरण करण्यासाठी ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !

कोल्हापूर (प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्यसाठी प्राणअर्पण करणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या बळावरच त्यांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना साकार केली. सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांनी घोडखिंड लढवली. यांचा त्याग, पराक्रम, बलिदान जागवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रतिवर्षी विविध हिंदुत्ववादी संघटना अन् समस्त धर्माभिमानी यांच्या समवेत ‘पावनखिंड मोहीम’ राबवते. या मोहिमेतून तरुणांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हावे, हाच उद्देश समोर असतो. यंदा ही मोहीम बुधवार, ३० जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता पावनखिंड येथे होत आहे.

      बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधी परिसरात होणार्‍या या मोहिमेसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी नरवीरांच्या स्मृतीला वंदन केल्यावर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या मोहिमेचा प्रसार सध्या कोल्हापूर आणि मलकापूर परिसरात चालू आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रार्णापण करणार्‍या हजारो वीर मावळ्यांचा आदर्श अंगी बाणण्यासाठी सर्वांनी ३० जुलैला सकाळी १०.३० वाजता पावनखिंड उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

अंबुजा सिमेंट्सची आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी

अंबुजा सिमेंट्सची आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी अहमदाबाद, : …