Home संशोधन प्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.

प्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.

3 second read
0
0
49

no images were found

प्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएच.डी.

कोल्हापूर (प्रतिनिधी):- तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगचे संशोधक प्रा महेश वासुदेव गावडे यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर प्रायसिंग इन ई-कॉमर्स विथ रिस्पेक्ट टू मार्केट ट्रेण्ड्स’ या विषयावर यशस्वी संशोधन पूर्ण केले असून विद्यापिठाकडून त्याना पीएच.डी. ही पदवी जाहीर झाली आहे.

या संशोधनात ई-कॉमर्स क्षेत्रातील किंमत निर्धारण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रांचा वापर करून बाजारातील ट्रेंड्सचा अभ्यास करण्यात आला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापिठाचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केले.

कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस आर पावसकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या …