Home संशोधन एनआयटी कोल्हापूर येथे विभागीय अविष्कार स्पर्धेचे यशस्वी आयोजन; ७२ महाविद्यालयांचा सहभाग

एनआयटी कोल्हापूर येथे विभागीय अविष्कार स्पर्धेचे यशस्वी आयोजन; ७२ महाविद्यालयांचा सहभाग

3 second read
0
0
9

no images were found

एनआयटी कोल्हापूर येथे विभागीय अविष्कार स्पर्धेचे यशस्वी आयोजन; ७२ महाविद्यालयांचा सहभाग : अविष्कार २०२६ विभागीय स्पर्धेत २४४ प्रकल्पांचे सादरीकरण
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित विभागीय अविष्कार स्पर्धा २०२६ चे न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूर येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ७२ महाविद्यालयांच्या २४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या संशोधन संकल्पना व नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेचे उद्घाटन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. बी. जी. बोराडे आणि चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी विद्यापीठाच्या निरीक्षक डॉ. संगीता दाहोत्रे आणि डॉ. गणेश वरखडे उपस्थित होते.

    “जेव्हा संवेदनशीलतेची जोड संशोधनाला मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजोपयोगी तंत्रज्ञान आकाराला येते,” असे प्रतिपादन एनआयटीचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी केले. संशोधनातून निर्माण होणारे तंत्रज्ञान केवळ नाविन्यपूर्ण न राहता समाजाच्या गरजा पूर्ण करणारे आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे असावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष श्री. बी. जी. बोराडे यांनी विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. शिक्षण, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत विकास साधणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी समाजातील समस्यांवर उपाय शोधावेत आणि सर्वसामान्यांना परवडणारे तंत्रज्ञान विकसित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विभागीय स्पर्धेतील विजेत्यांची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या निरीक्षक डॉ. संगीता दाहोत्रे यांनी दिली. स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन उत्कृष्टरीत्या केल्याबद्दल त्यांनी एनआयटीमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेत कृषी व पशुसंवर्धन, मानव्यविद्या; भाषा व ललित कला, वाणिज्य; व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच औषधनिर्माणशास्त्र या सहा विषयगटांचा समावेश होता. विविध विद्यापीठांतील १८ परीक्षकांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. दीपक जगताप आणि प्रा. अर्चना गायकवाड यांच्यासह प्रा. प्रवीण जाधव आणि डॉ. विवेक माने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार, एनआयटीचे रजिस्ट्रार श्री. संदीप पांडे, विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दीपक जगताप यांनी केले.

    संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या या विभागीय अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सादर करण्यासाठी आणि संशोधन क्षेत्रात पुढे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सभेचे आयोजन

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सभेचे आयो…