Home Uncategorized आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट:

आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट:

40 second read
0
0
42

no images were found

आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट:

नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार
 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्यावतीने हा विधायक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            आमदार अमल महाडिक यांचा वाढदिवस डिजिटल बोर्ड न लावता, हार-तुरे किंवा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याचा निर्णय नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी घेतला. महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना अद्ययावत आणि दर्जेदार संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले. या संचामध्ये MPSC आणि UPSC पूर्व, मुख्य परीक्षा मार्गदर्शक, पोलीस भरती, सैन्य भरती सराव प्रश्नपत्रिका, बँकिंग आणि रेल्वे भरतीसाठी आवश्यक अंकगणित व बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, इतिहास आणि भूगोल विषयांची संदर्भ विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

         नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी बोलताना आमदार अमल महाडिक यांचे कार्य नेहमीच जनसेवेला समर्पित राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून उद्याचे अधिकारी घडतील, हाच आमचा खरा आनंद आहे असे सांगितले.

विद्यार्थ्यांकडून स्वागत

         वाचनालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. अनेकदा महागडी पुस्तके विकत घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते, अशा वेळी वाचनालयातच ही पुस्तके उपलब्ध झाल्याने अभ्यासात सलगता राहील, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महानगरपालिका वाचनालयाच्यावतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. भास्करराव जाधव वाचनालयाचे ग्रंथपाल समीर म्हाब्ररी यांनी सांगितले की, “स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, त्यांना या नवीन पुस्तकांमुळे मोठा आधार मिळणार आहे.”

            यावेळी भाजपचे शक्ति केंद्र प्रमुख मिथुन मगदुम, गणेश राणे, किरण पोतदार, राहुल चौगले, गौरव जाधव, अनंत सावंत, ओंकार गोसावी, शुभम माईनकर, संकेत मुळीक, रमेश गायकवाड, मयुर चौगले, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक खाडे-पाटील यांनी राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…