Home Uncategorized आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नावाने फिरणाऱ्या खोट्या व्हाट्सअप अकाउंटपासून सावध राहा – महापालिकेचे आवाहन

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नावाने फिरणाऱ्या खोट्या व्हाट्सअप अकाउंटपासून सावध राहा – महापालिकेचे आवाहन

22 second read
0
0
31

no images were found

आयुक्त डॉराजेंद्र भारुड यांच्या नावाने फिरणाऱ्या खोट्या व्हाट्सअप अकाउंटपासून सावध राहा – महापालिकेचे आवाहन

 कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या फोटोचा वापर करून खाजगी व्हाट्सअप अकाउंटवरून मेसेजेस फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अकाउंट हे आयुक्तांचे अधिकृत अकाउंट नसून त्यावरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संदेशांना अथवा प्रलोभनाला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

            महापालिकेकडून कळविण्यात आले आहे की, कोणीही अशा खोट्या अकाउंटवरून फिरणारे मेसेज व्हायरल करू नयेत तसेच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अथवा इतर मागणीस प्रतिसाद देऊ नये.

            महापालिकेचा अधिकृत संपर्क क्रमांक 9766532001 असा असून, याशिवाय अन्य कोणत्याही व्हाट्सअप अकाउंटवरून आयुक्तांचा फोटो वापरून पाठविण्यात येणाऱ्या संदेशांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…