no images were found
सामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांना साहित्य वाटप
कोल्हापूर, : भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विविध योजनांच्या लाभाचे वाटप विचारे माळ येथील समाज कल्याण कार्यालयात आज लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे,इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणच्या सहा.संचालक सुनिता नेर्लीकर,समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे,जात पडताळणी संशोधन अधिकारी संभाजी पवार,अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
8 ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा होणाऱ्या या समता सप्ताह निमित्त प्रातिनिधिक स्वरूपात 15 विद्यार्थ्यांना स्वाधार योजना प्रमाणपत्र वाटप , 5 विद्यार्थ्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,शासकीय मुलांचे वसतीगृह/निवासी शाळेतील 4 विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र ,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळांमार्फत श्रीमती आरती दबडे यांना कापड दुकानासाठी थेट कर्ज योजनेंतर्गंत 1लाख रुपयांचा धनादेश तसेच रमाई घरकुल योजना लाभार्थ्यांना घराच्या चावीचे त्याचबरोबर दोन बचत गटांना मिनी ट्रॅक्टर सोबत त्यांच्या उपसाधनांचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या प्रसंगी विद्रोही शाहीर रणजीत कांबळे यांनी ” हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा ” या विषयावर अत्यंत खुमासदार शैलीत उपरोधिक भाष्य करत उपस्थितांना अंतर्मुख केले.यावेळी सचिन कांबळे, सचिन परब,सुरेखा डवर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी, लाभार्थी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते .