Home संशोधन शिवाजी विद्यापीठात ‘नॅनोस्पार्क’मध्ये ७५ संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवाजी विद्यापीठात ‘नॅनोस्पार्क’मध्ये ७५ संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

18 second read
0
0
5

no images were found

शिवाजी विद्यापीठात ‘नॅनोस्पार्क’मध्ये ७५ संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

 कोल्हापूर: विद्यार्थ्यांमधील संशोधनगुणांना प्रेरणा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागातर्फे “आयडियाज टुडे, इनोव्हेशन्स टुमारो, इम्पॅक्ट फॉरेव्हर” या घोषवाक्यासह ‘नॅनोस्पार्क २०२६’ या विशेष संशोधनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर “इग्नायटिंग यंग माइंड्स फॉर आविष्कार” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात ७५ संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यामध्ये ५ वैज्ञानिक मॉडेल्स आणि २६ वैज्ञानिक पोस्टर्स यांचा समावेश होता.

या वैज्ञानिक सादरीकरणासाठी एकूण ६ विद्याशाखांमधील विषय देण्यात आले. यामध्ये मानव्यविद्या व ललितकला, वाणिज्य व विधी, केवल विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखा या क्षेत्रांचा समावेश होता. यात पदवीस्तरीय, पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरीय संशोधक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या संशोधन सादरीकरणाचे राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांकडून मूल्यांकन व परीक्षण करण्यात आले. त्यासाठी पुण्याच्या सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. बाबुल प्रसाद, डॉ. जे. नित्यानंदन आणि डॉ. प्रकाश वाडगावकर उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक व विद्यापीठाचे ‘आविष्कार’ समन्वयक डॉ. पंकज पवार यांनीही परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

प्रकल्प सादरीकरणानंतर उपस्थित शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांसमवेत सुमारे दोन तास थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनातील आधुनिक आव्हाने, पेटंट्स आणि भविष्यातील संधींबद्दल मार्गदर्शन केले व शंकानिरसन केले.

शेवटच्या सत्रात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये पदवीस्तरीय विभागातील ४ व पदव्युत्तर विभागातील ४ अशा एकूण ८ सादरीकरणांना पुरस्कार मिळाले. यामध्ये सहारा पटेल (B.Sc.-III), तन्मयी पाटील (B.Sc.-II), अंकित कुमार, तन्वी वडनाल, अंजली मायने (तिघेही B.Sc.-II), पूर्वा खरात, कावेरी पुजारी (B.Sc.-I), समृद्धी गावडे (M.Sc.-I), प्रज्वल पाटील (M.Sc.-I), लंगम्बा थानओजम (M.Sc.-I), प्रणव कांबळे (M.Sc.-II) यांचा समावेश आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलचे संचालक प्रा. किरणकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा : वाढवण, गालाथि…