Home Uncategorized विनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई; अनअकॅडमी क्लासेस सील

विनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई; अनअकॅडमी क्लासेस सील

24 second read
0
0
6

no images were found

विनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाईअनअकॅडमी क्लासेस सील

कोल्हापूर,  : महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विनापरवाना खाजगी क्लासेसविरोधात अग्निशमन व परवाना विभागामार्फत संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली.

            अग्निशमन विभागाने शहरातील ३८ क्लासेसची तपासणी केली होती. यावेळी अग्निसुरक्षा उपकरणे अपुरी असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिशीची मुदत संपल्यानंतर आज नागाळा पार्क येथील एम्पायर टॉवरमधील अनअकॅडमी क्लासेसवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील इतर विनापरवाना क्लास चालकांची तपासणी करून तात्काळ अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी ओंकार खेडकर, दस्तगीर मुल्ला, परवाना निरीक्षक संदीप भोई, आकाश मिणचे, शिवाजी कोकरे, मनीष अतिग्रे तसेच फायरमन अभिजित सरनाईक, शकील पठाण आणि लियाकत बारसकर यांनी केली. शहरातील विनापरवाना व्यावसायिक आस्थापनांवर परवाना व अग्निशमन विभागामार्फत संयुक्त कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन – मंत्री हसन मुश्रीफ

सीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन R…