no images were found
गांधी मैदान परिसरातील 4 हातगाडया व चिदी विक्रेत्यांची 124 गाठोडी जप्त
कोल्हापूर : गांधी मैदान येथील महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाची आज दुपारी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी पाहणी केली. यावेळी वाचनालयाच्या परिसरात विनापरवाना असणाऱ्या हातगाड्या काढण्याचे आदेश उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान व अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ या परिसरातील 4 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच दुपारी उद्यम नगर येथील चिंदी विक्रेत्यांचे १२४ गाठोडी जप्त करून उर्वरीत गाठोडी तात्काळ काढण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
सदरची कारवाई सहा.आयुक्त उज्वला शिंदे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.