Home सहकार क्षेत्र गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : – जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : – जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

0 second read
0
0
7

no images were found

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : – जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली .
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापल्या परीने ठराव दाखल करण्याच्या मोहिमेमध्ये आघाडी घेत आहेत . भारतीय जनता पक्षाने ठराव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नाम.चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यालयात ठराव धारकांचा मेळावा घेऊन ताकतीने ठराव गोळा करण्याचे ठरविले होते.
त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या ठराव गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे.
सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद हॉल कोल्हापूर येथे एकत्र जमून, तेथून शक्ती प्रदर्शनाने सहाय्यक निबंधक (दुग्ध )कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी जाऊन ठराव दाखल करण्याची नियोजन केले आहे.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील,खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक,आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील माजी, आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार संजय बाबा घाटगे, राजे समरजितसिंह घाटगे, गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक, प्रवीण सिंह पाटील (मुरगूडकर ) गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, स्वाती कोरी, अशोकराव चराटी, के एस चौगुले, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, हंबीरराव पाटील या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुर येथील धैर्यप्रसाद हॉल पासून सहाय्यक निबंधक कार्यालय दुग्ध कोल्हापूर इथ पर्यंत शक्ती प्रदर्शन करत सर्व ठराव धारक ठराव दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि ठराव धारकांनी सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद हॉल कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सहकार क्षेत्र
Comments are closed.

Check Also

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसा करिअरच्या अमर्याद संधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या; डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात …