Home पुरस्कार ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’तर्फे ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’तर्फे ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

1 second read
0
0
19

no images were found

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’तर्फे ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

हेमंत पाटील यांच्या हस्ते पाच महिला क्रिकेटपटूंचा गौरव पुणे, : खेळाडूंच्या खिलाडीवृत्तीला सलाम करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे (आयएसी) आयोजित करण्यात आलेला ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ चा वितरण सोहळा पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. क्रिकेट क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या पाच उदयोन्मुख महिला खेळाडूंना यावेळी ‘क्रिकेट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएसीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी क्रिकेटपटू हेमंत किणीकर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनुजा पाटील उपस्थित होत्या. यंदाचा हा मानाचा पुरस्कार आय.पी.एल. खेळाडू पूनम खेमनार, किरण नवगिरे, गौतमी नाईक तसेच महाराष्ट्र राज्याच्या खेळाडू भक्ती मिरजकर आणि अक्षया जाधव यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुण्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या वाढत्या आलेखाबद्दल आणि मैदानातील त्यांच्या कौशल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास आपल्या मुली जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. मैदानात दाखवलेला संयम आणि जिद्द खऱ्या अर्थाने खेळाडूंना घडवते. आजच्या या महिला क्रिकेटपटू केवळ धावा करत नसून, आगामी पिढीसाठी यशाचा नवा मार्ग तयार करत आहेत. त्यांच्यातील हाच लढवय्या कणा देशातील क्रीडा क्षेत्राला अधिक मजबूत करेल, असे प्रतिपादन यावेळी बोलतांना पाटील यांनी केले. 

पुरस्कारार्थी खेळाडूंनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, यामुळे मैदानावर आणखी चांगली कामगिरी करण्याची ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. या प्रेरणादायी सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन प्रियांका कुंभार यांनी केले. कार्यक्रमाला पुण्यातील क्रीडाप्रेमी, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरला, हे विशेष. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पुरस्कार
Comments are closed.

Check Also

मोदी सरकारने डेमोग्राफिक बदलांवर उच्चस्तरीय समिती स्थापन केली, प्रत्येक घुसखोराला शोधून देशाबाहेर काढणार

मोदी सरकारने डेमोग्राफिक बदलांवर उच्चस्तरीय समिती स्थापन केली, प्रत्येक घुसखोराला शोधून दे…