कविता ही समाजाच्या जगण्याचे प्रतिबिंब: वसंत आबाजी डहाके : प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना काळसेकर पुरस्कार प्रदान कोल्हापूर,: कविता ही केवळ व्यक्तीगत नसते, तर तिच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवाचे अनेक पदर सामावलेले असतात. आजच्या मराठी कवितेत विस्थापन, बदलती कृषी संस्कृती, पर्यावरणाचा ऱ्हास, स्त्रीचे अस्तित्व आणि मानवी जगण्यातील संघर्ष यांचे संवेदनशील प्रतिबिंब उमटत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वसंत …