no images were found
स्टार हेल्थने महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून पूर्ण केली २० वर्षे; ४५०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली
- पुणे, सातारा, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि बीड यांच्यासह महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
- या उपक्रमाद्वारे ४,५०० हून अधिक व्यक्तींनी आरोग्य तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्य जागरूकतेचा लाभ घेतला.
- महाराष्ट्रात, स्टार हेल्थने २००६ मधील स्थापनेपासून आतापर्यंत १३,७८९ कोटी रूपयांहून अधिक किमतीचे २६.४ लाखांपेक्षा जास्त क्लेम्स (दावे) निकाली काढले आहेत.
- आपल्या आरोग्य सेवा केंद्र या सीएसआर आधारित उपक्रमाद्वारे, कंपनी अपुऱ्या सोयी-सुविधा असलेल्या समुदायांना विनामूल्य डॉक्टरांचा सल्ला, औषधे आणि निदानात्मक चाचण्या देखील प्रदान करते.
कोल्हापूर: आपल्या सेवा क्षेत्रातील २० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (NSE: STARHEALTH; BSE: 543412) महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत. याद्वारे स्थानिक समुदायांपर्यंत मुलभूत तपासणी, आरोग्य जागरूकता आणि आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्याची सुविधा पोहोचवण्यात आली. पुणे, सातारा, अहिल्यानगर, बारामती, दौंड, कोल्हापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नांदेड, लातूर, धाराशिव, नंदुरबार आणि बीड येथे हा उपक्रम राबवण्यात आला, जेथे वेळेवर निदान आणि सक्रिय आरोग्य सेवेची व्यापक उपलब्धता वाढवण्यावर भर देण्यात आला.
या बहु-शहरी संपर्क मोहिमेचा भाग म्हणून, स्टार हेल्थने ४,५०० हून अधिक सहभागींना आरोग्य तपासणी सुविधा पुरवल्या. यामध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची चाचणी, बीएमआय मूल्यमापन, डोळ्यांची तपासणी आणि सामान्य डॉक्टरांच्या सल्ल्याचा समावेश होता. पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रिपोर्टनुसार मार्गदर्शन करण्यात आले आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त सल्ल्यासाठी संदर्भित करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ ग्राहक, सल्लागार, कर्मचारी आणि स्थानिक समुदायातील वंचित घटकांना मिळाला; ज्यामध्ये आजारांना प्रतिबंध करणे, लवकर निदान करणे आणि आरोग्य जागरूकतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
आरोग्य साक्षरता आणि घरगुती आरोग्य सेवेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, स्टार हेल्थने डॉक्टर आणि समुदायांमध्ये ज्ञान-सामायिकीकरण सत्रांचेही आयोजन केले होते. यामुळे सहभागींना लवकर निदान, उपचारांचे मार्ग आणि वेळेवर वैद्यकीय मदतीचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली. या उपक्रमाला स्थानिक डॉक्टर, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि पॅनेलवरील आरोग्य सेवा भागीदारांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाच्या व्यापक महत्त्वाबाबत मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे पूर्णवेळ संचालक श्री. हिमांशू वालिया म्हणाले, “गेल्या २० वर्षांत, स्टार हेल्थने लाखो कुटुंबांना केवळ क्लेमच्या वेळीच नव्हे, तर त्यांच्या आरोग्य आणि वेलनेसच्या संपूर्ण प्रवासात साथ देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. यासारखे उपक्रम समुदायांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची व्याप्ती आणि खोली दर्शवतात; तसेच अधिक जागरूकता निर्माण करण्यास, लवकर निदान करण्यास प्रोत्साहित करण्यास आणि आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारण्यास मदत करतात. महाराष्ट्रात आमच्या प्रबळ उपस्थितीसह, आम्ही आरोग्य विमा आणि व्यापक आरोग्य व वेलनेस प्रयत्नांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यावर आमचे लक्ष केंद्रित ठेवत आहोत.”
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे बिझनेस हेड श्री. विजय अरोरा म्हणाले, “महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण राज्यात, हायपरटेंशन (उच्च रक्तदाब), मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारखे जीवनशैलीशी संबंधित धोके अधिक गंभीर होण्यापूर्वीच ते ओळखण्यात कम्युनिटी आउटरीच महत्त्वाची भूमिका बजावते. या शिबिरांच्या माध्यमातून, आम्ही संपूर्ण राज्यातील लोकांच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणापर्यंत सक्रिय आरोग्य सेवा, मुलभूत तपासणी आणि आरोग्य जागरूकता पोहोचवत आहोत. हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध समुदायांसाठी आरोग्य सेवा अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
स्टार हेल्थसाठी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. एकट्या याच राज्यात कंपनीने गेल्या २० वर्षांत १३,७८९ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे २६.४ लाखांहून अधिक क्लेम्स (दावे) निकाली काढले आहेत. तसेच, महाराष्ट्रात कंपनीच्या ८७ शाखा, ३,४०० हून अधिक भागीदार रुग्णालयांचे नेटवर्क, १.२३ लाखांपेक्षा जास्त सल्लागार आणि ५८ स्टार ग्रामीण विमा केंद्रे कार्यरत आहेत.
क्लेम्स निकाली काढण्यापलीकडे जाऊन, स्टार हेल्थ डिजिटल आणि आरोग्य सेवा उपक्रमांच्या माध्यमातून एक व्यापक आरोग्य भागीदार म्हणून आपली भूमिका पक्की करत आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, स्टार हेल्थच्या १ दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांनी टेलिमेडिसिन, आरोग्य तपासणी आणि एआय आधारित आरोग्य स्क्रीनिंग साधनांसह कंपनीच्या डिजिटल आरोग्य सेवांचा वापर केला.
स्टार हेल्थचा सीएसआर आधारित प्राथमिक आरोग्य सेवा उपक्रम आरोग्य सेवा केंद्रच्या माध्यमातून कंपनी अपुऱ्या सोयी-सुविधा असलेल्या समुदायांपर्यंत विनामूल्य आरोग्य सेवांचा विस्तार करत आहे. ही केंद्रे मोफत डॉक्टरांचा सल्ला, औषधे, निदानात्मक चाचण्या, आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि फॉलो-अप सपोर्ट प्रदान करतात; ज्यामुळे समुदाय स्तरावर प्राथमिक निगामधील त्रुटी दूर करण्यास मदत होते. महाराष्ट्रात हा उपक्रम ४ एएसके केंद्रे आणि १ एएसके+ केंद्रासह एकूण ५ केंद्रांच्या माध्यमातून नाशिक, सांगली, सातारा, अकोला आणि कोल्हापूर येथे कार्यरत आहे.