Home राजकीय केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह यांच्या २० जून रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था

केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह यांच्या २० जून रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था

7 second read
0
0
9

no images were found

 केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह यांच्या २० जून रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था

कोल्हापूर (प्रतिनिधी): शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, करवीर आणि राधानगरी तालुक्यातून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मेरीवेदर मैदान येथे करण्यात आली आहे.
कार्यकर्ते आणि नागरिकांनी आपली वाहने मेरीवेदर मैदानावर पार्क करावीत. मेरीवेदर मैदानावरून सभास्थळी पोहोचण्यासाठी मोफत शटल बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा.

     कागल, गडहिंग्लज, आजरा,चंदगड, भुदरगड तालुक्यातून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था महासैनिक दरबार हॉल परिसरात करण्यात आली आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांनी या ठिकाणी आपली वाहने पार्क करून पायी चालत सभास्थळी प्रवेश करावा.

     कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ताराबाई पार्क येथील पितळी गणपती जवळील फॉरेस्ट ऑफिस परिसरात करण्यात आली आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांनी या ठिकाणी आपली वाहने पार्क करून रमणमळा चौकमार्गे सभास्थळी प्रवेश करावा.

      भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच विशेष निमंत्रित व्यक्तींच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था एसपी ऑफिस समोरील पोलीस झेंडा गार्डन परिसरात करण्यात आली आहे. या ठिकाणी फक्त पास असलेल्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येईल याची नोंद घ्यावी.केंद्रीय मंत्री मा. अमितजी शाह यांच्या समवेत येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था अलंकार हॉल समोरील ग्राउंडवर करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहन

जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहन कोल्हापूर : महानगरपालिका कार्य…