no images were found
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी समिती गठीत
कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हातंर्गत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करण्यासाठी तपासणी पथक, पथके गठीत करण्यात आल्याची माहिती इचलकरंजी विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली आहे.
तपासणी समिती, पथक सदस्यांची नाव व पदनामे पुढीलप्रमाणे आहेत–आर.बी.येडगे- शाखा अभियंता, सा.बा.विभाग, हातकणंगले. विशाल आवळे- स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका. महेश शिंदे- मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले. राजाराम जाधव- गा.का. तलाठी कोरोची, हातकणंगले. पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी. एन.पी.शिंदे- शाखा अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती, हातकणंगले. संग्राम भोरे- स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका. दिलीप गायकवाड – अ.का. अपर तहसिल कार्यालय इचलकरंजी. आनंदा डवरी – सहा. तलाठी, इचलकरंजी, ता. हातकणंगले. पोलीस निरीक्षक- शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी. राधिका हावळ- उपनगर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका. सचिन भुत्ते- स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका. श्रीमती जानकी मिराशी- मंडळ अधिकारी भाग रुई, ता. हातकणंगले. महेश साळवी- तलाठी तारदाळ, ता. हातकणंगले. पोलीस निरीक्षक- शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी. संदिप जाधव- विद्युत अभियंता, इचलकरंजी महानगरपालीका. विनोद जाधव- स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका. राजू बांवणे- मंडळ अधिकारी भाग कबनूर,ता. हातकणंगले. गणेश सोनावणे- गा. का.तलाठी शहापूर ता. हातकणंगले. पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी याप्रमाणे तपासणी पथकांची निवड करण्यात आली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पथक सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती चौगुले यांनी केले आहे.