Home साहित्यिक छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्र कोल्हापूर

छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्र कोल्हापूर

34 second read
0
0
7

no images were found

छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्र कोल्हापूर

कौशल्य विकास योजनांच्या यशोगाथेचा लेख

योजनेचे नाव: श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो जर्मन टूल रूम (IGTR) प्रशिक्षण कार्यक्रम

         छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या कौशल्य विकास विभागामार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील युवक-युवती आणि महिलांच्या रोजगारक्षमता, उद्योजकता व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

  सारथी व इंडो जर्मन टूल रूम (IGTR), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रशिक्षण संस्थेमार्फत ITI, Diploma, व अभियांत्रिकी पदवीचे रोजगार मिळवून देणारे कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येते.

   श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो जर्मन टूल रूम (IGTR) प्रशिक्षण योजनेंतर्गत CNC मशीन ऑपरेशन, CAD/CAM डिझाईन, टूल अँड डाय मेकिंग, उत्पादन अभियांत्रिकी, गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश असून प्रशिक्षणार्थींना उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. परिणामी प्रशिक्षित युवकांना उत्पादन, अभियांत्रिकी व तांत्रिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत आहेत. यामध्ये 4 महिने , 6 महिने, 1 वर्ष अशा कालावधीचे कोर्सेस आहेत. सन २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २३७ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

1.सारथी लाभार्थी निखिल नरसिंग पाटील यांची यशोगाथा :

सारथीच्या साहाय्याने निखिल यांनी ‘पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड सीएडी-कॅम’ कोर्सला प्रवेश घेतला. त्यांनी टूल डिझाईन आणि CAD-CAM सॉफ्टवेअरचे उत्तम तांत्रिक ज्ञान आत्मसात केले. या दर्जेदार प्रशिक्षणाच्या बळावर आणि ‘सॉलिडवर्क्स’मधील ३ वर्षांहून अधिक अनुभवाच्या जोरावर निखिल आज एका कंपनीत ‘डिझाईन इंजिनिअर’ म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत.

2.सारथी लाभार्थी  सुमित साताप्पा साखरे यांची यशोगाथा :

  सुमित साताप्पा साखरे यांनी ‘Post Diploma in Tool Design and CAD/CAM’ या कौशल्याधारित प्रशिक्षणक्रमात प्रवेश घेतला. येथे त्यांनी CAD/CAM, 3D मॉडेलिंग आणि टूल डिझाईनचे अत्याधुनिक, व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. या दर्जेदार प्रशिक्षणामुळे सुमित यांच्या कौशल्याला नवी दिशा मिळाली. आज ते S.B. Resellers Pvt. Ltd. या कंपनीत ‘Design Engineer’ म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत.

सारथीच्या कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांमुळे युवक, युवती व महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्दिष्टांना पूरक ठरत या योजनांद्वारे समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा  लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन सारथीच्या वतीने करण्यात आले आहे.   

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In साहित्यिक
Comments are closed.

Check Also

सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. उमेश सांडू यांचे आज निधन 

सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श…