Home उद्योग एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर मोहिमेचे आगमन

एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर मोहिमेचे आगमन

32 second read
0
0
8

no images were found

एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर मोहिमेचे आगमन

मुंबई -इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि. ने आज आपल्या ऑल इंडिया ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचे गोव्‍यामध्‍ये आगमन झाल्याची घोषणा केली. देशभरातील शोध घेण्याची वृत्ती, एकता आणि मोटरसायकल रायडिंगच्या आवडीचा उत्सव साजरा करणाऱ्या या सातत्यपूर्ण ग्राहक-प्रवास उपक्रमातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.२ जून २०२६ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून सुरू झालेल्या या मोहिमेत रायडर्सनी जवळपास ३,२०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. आपल्या २१ दिवसांच्या आणि ६,००० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान त्यांनी श्रीनगर, अमृतसर, अत्तारी, लुधियाना, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, दमण आणि मुंबई या प्रमुख ठिकाणांना भेट दिली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी अशा एका प्रतीकात्मक प्रवासाच्या स्वरूपात आखण्यात आलेल्या या उपक्रमाचा देशातील रायडर्सना एकत्र आणण्‍याचा आणि भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्‍यचा मनसुबा आहे. हा उपक्रम प्रदेश, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन मोटरसायकल रायडिंगमुळे निर्माण होणारा सामायिक बंध अधोरेखित करतो. साहसाची भावना अंगीकारून उत्साही रायडर्सद्वारे हा प्रवास केला जात आहे, ज्यामध्ये यामाहाची मॉडर्न-रेट्रो स्पोर्ट्स बाईक एक्सएसआर155 त्यांच्या सोबतीला आहे. ही मोटरसायकल अभिजात (टाइमलेस) डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मेळ साधते.

    या प्रवासाच्या गोवा टप्प्याचा एक भाग म्हणून, यामाहाने एक्सएसआर155 च्या मालकांसोबत यामाहाच्या ब्लू स्क्वेअर शोरूममध्ये एका विशेष भेटीचे आयोजन केले होते, ज्याने शहरातील रायडिंग प्रेमींच्या वाढत्या समुदायाला एकत्र आणले. या मेळाव्यात एक्सएसआर155 मालकांनी (ओनर्स) रायडर्सचे उत्साहात स्वागत केले आणि त्यांच्या या देशव्यापी मोहिमेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचा अविभाज्य भाग असलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून यामाहाचे आपल्या ब्लू स्ट्रीक्स कम्युनिटीला अधिक प्रबळ करण्‍याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम विविध पार्श्वभूमीच्या यामाहा रायडर्सना बाईक रायडिंगची सामायिक आवड आणि यामाहा ब्रँडवरील प्रेमाच्या धाग्याने एकत्र आणतो, ज्यातून दीर्घकालीन नातेसंबंध आणि आजीवन ब्रँड अॅम्बेसेडर तयार होतात.

    रायडर्स महामार्ग, पर्वतीय रस्ते, शहरी भाग आणि किनारी भागांमधून आपला प्रवास पुढे चालू ठेवत असताना हा उपक्रम मोटरसायकलची टिकाऊ क्षमता दाखवण्‍यासह यामाहा आणि तिच्या रायडर्सची व्याख्या ठरणारी साहसी वृत्ती व आवड देखील अधोरेखित करतो.मुंबई -इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि. ने आज आपल्या ऑल इंडिया ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचे गोव्‍यामध्‍ये आगमन झाल्याची घोषणा केली. देशभरातील शोध घेण्याची वृत्ती, एकता आणि मोटरसायकल रायडिंगच्या आवडीचा उत्सव साजरा करणाऱ्या या सातत्यपूर्ण ग्राहक-प्रवास उपक्रमातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.२ जून २०२६ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून सुरू झालेल्या या मोहिमेत रायडर्सनी जवळपास ३,२०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. आपल्या २१ दिवसांच्या आणि ६,००० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान त्यांनी श्रीनगर, अमृतसर, अत्तारी, लुधियाना, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, दमण आणि मुंबई या प्रमुख ठिकाणांना भेट दिली आहे.

    काश्मीर ते कन्याकुमारी अशा एका प्रतीकात्मक प्रवासाच्या स्वरूपात आखण्यात आलेल्या या उपक्रमाचा देशातील रायडर्सना एकत्र आणण्‍याचा आणि भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्‍यचा मनसुबा आहे. हा उपक्रम प्रदेश, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन मोटरसायकल रायडिंगमुळे निर्माण होणारा सामायिक बंध अधोरेखित करतो. साहसाची भावना अंगीकारून उत्साही रायडर्सद्वारे हा प्रवास केला जात आहे, ज्यामध्ये यामाहाची मॉडर्न-रेट्रो स्पोर्ट्स बाईक एक्सएसआर155 त्यांच्या सोबतीला आहे. ही मोटरसायकल अभिजात (टाइमलेस) डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मेळ साधते.

      या प्रवासाच्या गोवा टप्प्याचा एक भाग म्हणून, यामाहाने एक्सएसआर155 च्या मालकांसोबत यामाहाच्या ब्लू स्क्वेअर शोरूममध्ये एका विशेष भेटीचे आयोजन केले होते, ज्याने शहरातील रायडिंग प्रेमींच्या वाढत्या समुदायाला एकत्र आणले. या मेळाव्यात एक्सएसआर155 मालकांनी (ओनर्स) रायडर्सचे उत्साहात स्वागत केले आणि त्यांच्या या देशव्यापी मोहिमेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचा अविभाज्य भाग असलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून यामाहाचे आपल्या ब्लू स्ट्रीक्स कम्युनिटीला अधिक प्रबळ करण्‍याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम विविध पार्श्वभूमीच्या यामाहा रायडर्सना बाईक रायडिंगची सामायिक आवड आणि यामाहा ब्रँडवरील प्रेमाच्या धाग्याने एकत्र आणतो, ज्यातून दीर्घकालीन नातेसंबंध आणि आजीवन ब्रँड अॅम्बेसेडर तयार होतात.

     रायडर्स महामार्ग, पर्वतीय रस्ते, शहरी भाग आणि किनारी भागांमधून आपला प्रवास पुढे चालू ठेवत असताना हा उपक्रम मोटरसायकलची टिकाऊ क्षमता दाखवण्‍यासह यामाहा आणि तिच्या रायडर्सची व्याख्या ठरणारी साहसी वृत्ती व आवड देखील अधोरेखित करतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई कोल्हापूर  : महानगरपालिकेच…