Home Uncategorized इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशभरात ‘इसुझू आय-केअर प्री-मान्सून सर्व्हिस कॅम्प’च्या आयोजनाची घोषणा

इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशभरात ‘इसुझू आय-केअर प्री-मान्सून सर्व्हिस कॅम्प’च्या आयोजनाची घोषणा

1 min read
0
0
8

no images were found

इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशभरात ‘इसुझू आय-केअर प्री-मान्सून सर्व्हिस कॅम्प’च्या आयोजनाची घोषणा

  • ग्राहक 18 ते 24 जून 2026 या कालावधीत इसुझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर आकर्षक सेवा लाभ* मिळवू शकतात.

 चेन्नई, : सर्वोत्तम सेवा तसेच मालकीचा अनुभव देण्याच्या इसुझू’च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नात, इसुझू मोटर्स इंडिया आपल्या इसुझू डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हीच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-मान्सून कॅम्प’ आयोजित करणार आहे. या सेवा शिबिराचा उद्देश ग्राहकांना देशभरात सर्व मोसमात त्रास-मुक्त वाहन चालविण्याच्या अनुभवासाठी रोमांचक लाभ तसेच प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध करून देणे हा आहे.

 

‘इसुझू केअरच्या पुढाकाराने, दिनांक 18 ते 24 जून 2026 (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान सर्व इसूझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर मान्सूनपूर्व शिबिराचे आयोजन केले जाईल. या कालावधीत, ग्राहक त्यांच्या वाहनांसाठी विशेष ऑफर आणि लाभ देखील मिळवू शकतात. 

आग्रा, अहिल्यानगर, अहमदाबाद, अंबिकापूर, बारामुल्ला, बरेली, बारमेर, भरूच, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिकानेर, बिलासपूर, कालिकत, छत्रपती संभाजी नगर, चेन्नई, चिकमंगळुरू, कोईमबतूर, धुळे, दिल्ली, दिब्रूगड, दिमापूर, दुर्गापूर, एर्नाकुलम, गांधीधाम, गोरखपूर, गुरूग्राम, गुवाहाटी, हावडा, हुबळी, हैदराबाद, इंदूर (2), जगदलपूर, जयगाव, जयपूर, जालंधर, जम्मू, जोधपूर, कडप्पा, कलबुर्गी, कर्नाल, कायमकुलम, खम्मम, कोल्हापूर, कोलकाता, कोट्टायम, कुर्नूल, लातूर, एलबी नगर (हैदराबाद) लेह, लखनऊ, लुधियाना, मदुराई, मंडी, मंगळुरू, मेहसाणा, मोहाली, मुंबई (नेरूळ) मुंद्रा, म्हैसूर, नागपूर, नामक्कल, नाशिक, नेल्लोर, निजामाबाद, नोएडा, ओंगोल, पाटणा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, रत्नागिरी, सातारा, शिवमोगा, सीकर, सिलीगुडी, सोलापूर, सुरत, थेनी, त्रिशूर, तिरुनेलवेली, तिरुपती, त्रिची, तिरुवनंतपुरम, वडोदरा, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि यवतमाळ येथील इसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधाकेंद्रांत प्री-मान्सून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राहकांना नजीकच्या इसुझू विक्रेता दालनात संपर्क साधता येईल किंवा ते सर्व्हिस बुकिंगकरिता https://isuzu.in/servicebooking ला भेट देऊ शकतात. अधिक माहितीसाठी ग्राहक 1800 4199 188 (टोल फ्री) वर संपर्क साधू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या…